मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 9 May 2024 : गजकेसरी योगात कोण-कोणत्या राशीला मिळणार नशिबाची साथ! वाचा आजचे राशीभविष्य

Today Horoscope 9 May 2024 : गजकेसरी योगात कोण-कोणत्या राशीला मिळणार नशिबाची साथ! वाचा आजचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 09, 2024 08:43 AM IST

Today Horoscope 9 May 2024 : आज ९ मे २०२४ गुरुवार रोजी, शोभन योग असून, चंद्र आज चंद्र वृषभ राशीतून संक्रमण करणार आहे. त्यामुळे शोभन योग तयार होत आहे. ग्रह-नक्षत्राच्या या बदलामुळे १२ राशींवर काय परिणाम होईल? वाचा राशीभविष्य!

राशीभविष्य ९ मे २०२४
राशीभविष्य ९ मे २०२४

आज चंद्रदर्शनचा योग आहे. तसेच चंद्र गुरुशी संयोग करत असून गजकेसरी योग घटित होत आहे. आजच्या दिवसावर गुरुचा प्रभाव राहणार आहे. त्यासोबतच चंद्र वृषभ राशीतून संक्रमण करणार आहे. त्यामुळे शोभन योग तयार होत आहे. आज बालव करणात गुरुवारचा दिवस १२ राशीसाठी कशा स्वरुपाचा असणार आहे ते जाणून घेऊया.

मेष

आज गुरुवारचा दिवस मेष राशीसाठी उत्तम असणार आहे.आज गुरू आणि चंद्राचा योग जुळून येत असून आर्थिक बाबतीत खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. गुरूबल लाभल्याने भाग्याची साथ चांगली मिळेल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच्या मार्गावर राहतील. इतरांसमोर तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. दूरच्या प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल.

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे.आज बालव करणात स्वभावात थोडा तापटपणा राहील. त्यामुळे कामात अडचणी येऊ शकतात. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा. अती संवेदनशील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीचा विनाकारण विचार करीत रहाल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूल काळ आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे.

मिथुन

मिथुन राशीसाठी आज गुरू-चंद्र संयोग विशेष लाभदायक ठरणार आहे. शत्रूंचा कट तुम्ही चालाखीने उधळून लावाल. प्रत्येक विरोधकावर मात करण्याची ताकद येईल. इतरांना सल्ले देण्यात आणि इतरांच्या वर्तनात कशी सुधारणा हवी हे समजवण्यासाठी धडपड कराल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. अध्यात्मिक उन्नती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक वेग आणि नेमकेपणा राहिल.

कर्क

कर्क राशीसाठी अजचग दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल. आज शोभण योगात तुमची वृत्ती आनंदी असली तरी कोणी तुमच्याशी स्पर्धा करीत आहे असे जाणवल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमचे कोणतेही काम एका प्रयत्नात होणार नाही. त्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. वरिष्ठांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. घरातील वातावरण ताण-तणावात्मक राहील.

सिंह

आज गुरुवारचा दिवस सिंह राशीसाठी चांगला असणार आहे. आज चंद्रबल चांगले लाभल्याने कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. व्यवसायात एखादे काम मिळण्याच्या मागे असाल तर उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील. उद्योग-व्यवसायातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल.

कन्या

आज कन्या राशीसाठी ग्रहयोग अनुकूल आहेत. आज व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळल्यामुळे बढती मिळू शकते. रहाणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. सार्वजनिक कार्यात पदप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. प्रगतीच्या नवनवीन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत.

तूळ

आज तूळ राशीसाठी चंद्रभ्रमण शुभ स्थानातून होत आहे. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्रपरिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये.

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आज गुरुवारचा दिवस चांगला असणार आहे. आज चंद्राशी होणारा गुरूचा योग पाहता ग्रहांची अनुकूलता आहे.कामाच्या ठिकाणी विविध सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. परंतु पैसे हातात मिळायला थोडा वेळ लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

धनु

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज शोभन योग तयार होत आहे. अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल.

मकर

मकर राशीसाठी आज चंद्रबल शुभ राहणार आहे. त्यामुळे मकर राशीच्या लोकांना दिवस चांगला जाईल.कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्रमैत्रिणींची अचानक भेट घडून येईल. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग जुळून येत आहे. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल.

कुंभ

कुंभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. या राशीसाठी आज गुरू चंद्र योग जुळून येत आहे. आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर स्वतःचे आरोग्यही जपा. व्यवसायिकांना व्यवसायासाठी विविध अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती तुम्हाला वाटेल. प्रेमीवीरांना एकमेकाना समजून घ्यावे लागेल.

मीन

मीन राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. वैवाहिक आयुष्यात एकमेकांना समजून घ्यावे लागेल. त्यामुळे मनाला थोडी शांतता मिळेल. अर्थिक व्यवहारात गुंतवणूक करताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील.

WhatsApp channel