मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 9 June 2024 : ग्रहणयोगात आज सुट्टीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 9 June 2024 : ग्रहणयोगात आज सुट्टीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार? वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jun 09, 2024 08:21 AM IST

Today Horoscope 9 June 2024 : आजच्या चंद्र गोचरने नवमपंचम योग, विषयोग, ग्रहणयोग असे विविध योग जुळून येत आहेत, वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य ९ जून २०२४
राशीभविष्य ९ जून २०२४

आज रविवार 9 जून २०२४ रोजी चंद्र शनि, राहु व नेपच्यूनशी नवमपंचम योग तयार करीत आहे. तसेच यातून विषयोग, ग्रहणयोग घटीत होत आहेत. या योगांमध्ये आज सुट्टीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार ते राशीभविष्याचा माध्यमातून जाणून घेऊया.

मेषः 

आज वृद्धी योगात प्रत्येक विरोधकावर मात करण्याची ताकद येईल. इतरांना सल्ले देण्यात आणि इतरांच्या वर्तनात कशी सुधारणा हवी हे समजवण्यात पुढे रहाल.

वृषभः 

आज वणिज करणात काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल.

मिथुनः 

आज राहु आणि चंद्र यांचा योग होत असून खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल.

कर्कः 

आज शनि चंद्र योगात तुमच्या अत्यंत सौम्य व शांत स्वभावाचा फायदा कोणी घेत नाही ना याकडे लक्ष द्या. घरामध्ये कोणाच्याही आजारपणासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.

सिंहः 

आज चंद्र नेपच्युन संयोगात व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. त्यामुळे थोडी शांतता मिळेल.

कन्याः 

आज चंद्रबल शुभ राहिल्याने ऐषारामी जीवन जगावे असे वाटेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल.

तूळ:

आज चंद्र नेपच्युनशी योग करत आहे. थोडा तापट स्वभाव सगळ्यावर पाणी पाडू शकतो. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा.

वृश्चिकः 

आज चंद्रभ्रमण पाहता घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत महत्वाची जबाबदारी मिळेल.

धनुः 

आज वृद्धी योग पाहता ग्रहांची अनुकूलता आहे. तुमच्या अंगच्या धडाडीचा मात्र फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल.

मकरः 

आज चंद्रबल चांगले लाभल्याने कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. व्यवसायात एखादे काम मिळण्याच्या मागे असाल तर उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील.

कुंभः 

आज शनि चंद्र योगात व्यापारात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील.

मीनः 

आज चंद्र नेपच्युन नवमपंचम योगात तुमची वृत्ती आनंदी असली तरी कोणी तुमच्याशी स्पर्धा करीत आहे असे जाणवल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल.

WhatsApp channel