मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Rashi Bhavishya Today 9 July 2024 : आज अंगारक चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya Today 9 July 2024 : आज अंगारक चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? वाचा राशीभविष्य

Jul 09, 2024 03:00 AM IST

Astrology prediction today 9 July : चंद्र कर्क आणि सिंह राशी तुन भ्रमण करणार असुन आश्लेषा व मघा नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, जाणून घ्या आजचे सविस्तर राशीभविष्य.

आजचे राशीभविष्य ९ जुलै २०२४
आजचे राशीभविष्य ९ जुलै २०२४ (Freepik)

Today Horoscope 9 July 2024 : आज अंगारक चतुर्थी आहे. चंद्र कर्क आणि सिंह राशी तुन भ्रमण करणार असुन आश्लेषा व मघा नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. सिद्धी योग व वणिज करण राहील. चंद्राचा बुधाशी योग होत असुन कसा असेल सोमवार! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज सिद्धी योगात एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. तुम्ही करीत असलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन पार पाडण्याची कुवत आज दाखवून द्याल. आर्थिक आघाडी वर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा. निर्माण होईल. कुटुंबापासुन वेगळे राहण्याचे प्रसंग येतील

शुभरंगः नांरगी 

शुभदिशाः दक्षिण.

शुभअंकः ०१, ०५.

वृषभ: 

आजचं चंद्र भ्रमण शुभ असल्याने नोकरी व्यवसायात आपल्या कामाच्या पद्धतीत बदल कराल. गोड बोलण्यावर भर ठेवाल. तुम्ही स्वत: ज्या गोष्टींचे चिंतन कराल त्यातून भरीव काहीतरी निर्माण करून फायदे मिळवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. आनंददायी वातावरण राहिल. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत.

शुभरंगः गुलाबी 

शुभदिशाः आग्नेय.

शुभअंकः ०४, ०८.

मिथुन: 

आज वणिज करणात नोकरीत योग्य संधी न मिळाल्यामुळे संभ्रमात पडाल. येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तर्कशुद्ध विचारांचा मागोवा घ्यावा लागेल. घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल. कामाला जास्त महत्त्व द्याल. खूप नकारात्मक विचार मनात येतील. त्यांना सकारात्मक बनवलेत तर कामे पुढे जातील. मनावरचा ताण बर्‍या पैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

शुभरंगः पोपटी 

शुभदिशाः उत्तर.

शुभअंकः ०३, ०९.

कर्क: 

आज चंद्राची स्थिती लक्षात घेता एक प्रकारचा उत्साह अंगी संचारेल. भाग्याची साथ चांगली मिळेल. व्यवसायात साम दाम दंड भेद या नीतीने वागून तुम्ही ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल. बोलण्याची हातोटी चांगली असल्यामुळे तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. घरातआणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदारा कडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.

शुभरंगः पांढरा 

शुभदिशाः वायव्य.

शुभअंकः ०४, ०७.

सिंह: 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. थोडी निराशा वादी प्रवृत्ती राहील. करियरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. स्थावर इस्टेटीचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामामध्ये अडचणी वाढतील. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. जवळचे मित्र आप्तेष्ट संबंध तुटण्याची शक्यता आहे. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्या कडे लक्ष दया. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क रहा. फसवणूक आर्थिक हानी संभवते. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वैद्यकीय बाबीवर खर्च होईल.

शुभरंगः लाल 

शुभदिशाः पूर्व.

शुभअंकः ०५, ०७.

कन्या: 

आज सिद्धी योगात आपणास पैसा मिळाला तरी त्याला अनेक वाटा फुटतील. तुमच्या कडक बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. तुमचा मुड कधी जाईल आणि कधी चिडाल याचा भरवसा राहणार नाही. मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. मनात उदासिनता वाढेल. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. नाहीतर कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. मनाविरुद्ध कार्य घडतील.

शुभरंगः हिरवा 

शुभदिशाः उत्तर.

शुभअंकः ०६, ०८.

तूळ: 

आज चंद्र बुध संयोगात कुटुंबातील नातेवाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. दुसऱ्याना काही कळू न देता जेवढ्या गुप्त गोष्टी तुम्हाला करता येतील तेवढ्या करणार आहात. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळ पणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्या साठी गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहिल. उष्णतेचे विकार उद्‌भवतील.

शुभरंगः भगवा 

शुभदिशाः पश्चिम.

शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक: 

आजचा चंद्रयोग पाहता घरामध्ये अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्याल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या नवीन योजनांना दाद मिळेल. परदेशगमनाच्या संधी मिळतील. सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्यामुळे इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्या सारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा. जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या.

शुभरंगः तांबूस 

शुभदिशाः दक्षिण.

शुभअंकः ०५, ०८.

धनु: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने व्यवसायात सतत काहीतरी उलाढाल करत रहाल. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. प्रवासात काळजी घ्यावी. नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी रहाल. तरुणांच्या अती आधुनिक वागण्यामुळे त्यांचे मोठ्या लोकांशी पटणार नाही. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबा तील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवती पेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. लहरी स्वभाव व व्यसनाधिनता यावर आवर घालावा लागेल.

शुभरंगः पिवळा 

शुभदिशाः ईशान्य.

शुभअंकः ०६, ०९.

मकर: 

आज चंद्र भ्रमणातून शुभ फलदायी घटना घडणार आहेत. तुमच्याकडे अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. या कामांना न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल. त्या प्रयत्नात सफलतापूर्वक यश मिळेल.

शुभरंगः निळा 

शुभदिशाः नैऋत्य.

शुभअंकः ०५, ०८.

कुंभ: 

आज चंद्र बुध योगात अविचाराची लक्ष्मणरेषा ओलांडली नाहीत तर फायद्याचे प्रमाण वाढेल. आत्म विश्वास उत्तम असल्या मुळे कोणत्याही समस्येला पाठीवर घेण्याची ताकद तुमच्याकडे राहील. तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रुपांतर प्रेमात होऊ शकेल. धाडस करताना मनाशी काही आडाखे निश्चित बांधाल. घरासंबंधी समस्या होऊ शकते. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापारीवर्गाकरिता आजचा दिवस नुकसानदायक राहण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजी पूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वाहन जपून चालवा. अपघात भय संभवते. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.

शुभरंगः जांभळा 

शुभदिशाः पश्चिम.

शुभअंकः ०१, ०९.

मीन: 

आज चंद्र बुध योगात खोटी स्तुती तुम्हाला कधीच भूल पाडणार नाही. या स्वभावामुळे तुमच्या वाटेला जायचे लोक प्रकर्षाने टाळतील. नोकरीत थोडा दूरदर्शी पणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृती कडे दूर्लक्ष करून चालणार नाही. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल यात शंका वाटते. नवनविन प्रलोभने येत राहतील. आपली मानसिकेला विचलित करणाऱ्या घटना घडतीत. व्यापारात काळजी पूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. चंद्रावर शनीची दृष्टी असल्याने मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.

शुभरंगः पिवळा 

शुभदिशाः ईशान्य.

शुभअंकः ०६, ०९.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

Weekly Lucky Zodiac Signs : राजयोगाचा 'या' राशींना होणार सर्वाधिक लाभ! या ३ राशीच्या लोकांसाठी लकी आठवडा

WhatsApp channel