आज बुधवार ८ मे रोजी, चैत्र अमावस्या समाप्ती होत असून, भरणी नक्षत्र आणि सौभाग्य योग आहे. आज चंद्र मेष राशी नंतर वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. किंस्तुघ्न करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज ग्रहमान अनुकुल असल्याने नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. भावंडांकडून मदत मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल.
आजचा दिवस वृषभ राशीसाठी थोडासा त्रासदायक असेल. आज सौभाग्य योगात आर्थिकबाबतीत पैसा वसूल करण्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील. थोडयाशा त्रासाने उधारीचे पैसे परत मिळणार आहेत. बौद्धिक क्षमतेच्या जोरावर प्रगती होईल.तुमच्या धोरणीपणामुळे मिळालेले यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. एक वेगळेच उत्साही आणि आनंदी वातावरण लाभेल.
मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. मेहनतीच्या तुलनेत कमी यश मिळत असल्यामुळे थोडे निराशेकडे झुकाल. यामध्ये नेमकी चूक कुठे होते हे जाणून घेण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवासाचे योग जुळून येतील. जवळच्या व्यक्तीची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. कोणतीही खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे.
कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. आज चंद्रबल उत्तम लाभणार आहे. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. पैशांची चणचण समाप्त होऊन आर्थिक घडी बसेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची सुरुवात कराल. स्वतःला प्रकाशझोतात आणायचे असेल तर कोणा मध्यस्थाचा आधार घ्यावा लागेल. कलाकरांना चांगल्या संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल.
सिंह राशीसाठी आज ग्रहमान प्रतिकुल असणार आहे. घरातील काही कारणांमुळे मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल. हातात अचानक पैसा आल्यामुळे जुनी देणी देऊन टाकाल. व्यवसायात कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीनुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने तुम्हाला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित आणि नुकसानकारक ठरतील.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. आज किस्तुघ्न करणात परदेशगमनाचे योग जुळून येतील. नवीन आर्थिक गुंतवणूक कराल. घरामध्ये अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे थोडीशी चिडचिड होईल. स्वतःच्या मतासोबतच इतरांचाही विचार करावा लागेल. वैवाहिक जीवनात पहिल्यांदाच जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. संततीच्या मनाचा आदर केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होईल. त्यामुळे मुलेही आनंदी राहतील.
तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आजच्या चंद्रभ्रमणात तुम्ही जे काम कराल त्यामध्ये लोक तुमच्या बाजूने खंबीर राहतील. त्यामुळे समाजात मानसन्मान मिळेल. घरामध्ये येणाऱ्या नव्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. या गोष्टीचा थोडासा ताणही येईल. प्रगतीचे नवे मार्ग तुम्हाला खुले होतील. लांबचा प्रवास आनंददायक ठरेल. नोकरदार वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना फायद्याचे ठरणारआहे.
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज किस्तुघ्न करणात परिस्थितीचा उत्तम आढावा घेताना स्वत:ची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना भरभरुन सहकार्य कराल. तुमच्या क्षेत्रात नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.
आजचा दिवस धनु राशीसाठी संमिश्र असेल. आज सौभाग्य योगात आर्थिक स्थिती बरी राहिली तरीही काही गोष्टींबाबत हात आकडता घ्याल. सर्वच बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील.
मकर राशीसाठी आजचा दिवस संयमाचा असणार आहे. आज सौभाग्य योगात तुमच्या हातून कोणता अविचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची शक्यता आहे. कर्ज असणाऱ्यांनी हप्ते वेळेवर फेडण्याची खबरदारी घ्यावी. शांत आणि धीमेपणाने काम करण्याच्या वृत्तीमुळे रचनात्मक कामाकडे ओढ राहील. अनुकूल परिस्थितीचा आढावा चांगल्याप्रकारे घ्याल. इतरांवर जास्त विश्वास ठेवत नसल्यामुळे कामाचा भार स्वत:च उचलाल त्यामुळे शारीरिक-मानसिक थकवा जास्त जाणवेल. अतोनात मेहनत करूनही कामाचे फळ कमी प्रमाणात मिळेल.
कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज ग्रहयोग उत्तम साथ देतील. बरीच रखडलेली कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. तुमची मते मुलांच्या गळी उतरवण्यासाठी जरा जास्तच शक्ती खर्च करावी लागेल. संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जरा जास्त राहिल्यामुळे स्वभावात तापटपणा वाढेल. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. दुसऱ्यावर कुरघोडी करण्यापूर्वी विचार करावा लागेल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज आर्थिक गुंतवणूक करण्यास दिवस उत्तम आहे. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल.
मीन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. आज चंद्रभ्रमणात नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. स्वभाव थोडा अस्थिर आणि चंचल राहील. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. तुमच्यातील सुप्त कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. कामात बढती मिळेल.