मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 8 June 2024 : आजचा शनिवार मजेत जाणार की टेन्शन वाढवणार? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 8 June 2024 : आजचा शनिवार मजेत जाणार की टेन्शन वाढवणार? वाचा राशीभविष्य

Jun 08, 2024 08:19 AM IST

Today Horoscope 8 June 2024 : आज शनिवारचा दिवस राशीचक्रातील बाराही राशींसाठी कसा जाणार, वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य ८ जून २०२४
राशीभविष्य ८ जून २०२४

आज शनिवार ८ मे २०२४ रोजी चंद्र राहूच्या नक्षत्र आर्द्रानंतर पुनर्वसु नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. तसेच, प्लुटोशी षडाष्टक योग निर्माण करीत आहे. या योगाचा प्रभाव राशीचक्रातील बारा राशींवरसुद्धा दिसून येणार आहे. पाहूया आजचा दिवस तुम्हाला कसा जाणार, वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष: 

आज तैतील करणात व्यापार रोजगारात नवीन संधी उपलब्ध होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नातेवाईकांकडून तुम्हाला सहकार्य चांगले मिळणार आहे.

वृषभ: 

आज गंड योग पाहता करियरमध्ये तुमच्या चपळ कार्य क्षमतेमुळे आपापल्या कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा तुम्ही उमटवणार आहात.

मिथुनः 

आज प्लुटो चंद्र षडाष्टक योगात नवीन योजना यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. फक्त यामध्ये थोडे धाडस दाखवा. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल.

कर्क: 

आज आर्द्रा नक्षत्रातुन होणारे चंद्रगोचर पाहता प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील.

सिंह: 

आज राहुच्या नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण पाहता घरात किंवा घराबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील.

कन्या: 

आजचे गंड योग पाहता खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा.

तूळ: 

आजचे चंद्रबल अनिष्ट असल्याने अंहकारी वृत्ती मुळे यांचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात.

वृश्चिकः 

आज प्लुटो चंद्र संयोगात राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. फक्त कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका.

धनु: 

आज शुभ चंद्रबल पाहता घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल.

मकर: 

आज आर्द्रा नक्षत्रातील चंद्र भ्रमणात प्रत्येक बाबतीत थोडा आळशीपणा कराल. परदेशासंदर्भात काही कामे असतील तर ती रखडतील. घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ: 

आज प्लुटो चंद्र योगात कोणतीही नवीन योजना राबवताना त्या वास्तव परिस्थितीला धरून आहेत की नाही याचा विचार अवश्य करावा.

मीन: 

आज तैतील करणात मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत.

WhatsApp channel