आज मंगळवार ७ मे रोजी, चैत्र कृष्ण चतुर्दशी असून, अश्विनी नक्षत्र आणि आयुष्मान योग आहे. आज चंद्र मेष राशीत संक्रमण करणार आहे. चतुष्पाद करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद, मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल.
आज व्यावसायिकांना धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील.
आज एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. यशस्वी व्हाल. योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल.
आज दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. व्यापार उद्योगात प्रगती राहील.
आज तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मानसिक अवस्था उत्तम राहील. अतिउत्साह टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. भरभराटीचा दिवस आहे. कामे पूर्णत्वास जातील.
आज वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. फसवणूक किंवा आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील.
आज जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. मन चिंताग्रस्त राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे.
आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नये. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहील. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडू शकते.
आज नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध घेतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. तुमची निरीक्षणक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्य रितीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल.
आज अडलेली कामे मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. प्रगतीकारक बदल होतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल.
आज अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले होईल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. प्रवास नुकसानकारक राहील.
आज मुलाखतीत यश मिळेल. तुम्ही घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. तुमच्या मनासारखे झाल्यामुळे तब्येत खूष होऊन जाईल. सामाजिक मान सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन घडणार आहे. मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या