आज शुक्रवार ७ मे २०२४ रोजी चंद्र वृषभ व मिथुन राशीतून आणि मृगशीर्ष नक्षत्रातून गोचर करणार आहे. या चंद्रभ्रमणातून शनिशी नवमपंचम योग तयार होत आहे. या नवमपंचम योगात शुक्रवारचा दिवस तुम्हाला कसा जाणार हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.
आज शूल योगात शेअर गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. घरामध्ये तरुण वर्गाची ये जा राहील. तापटपणा आवरावा लागेल.
आज चंद्रबल अनिष्ट असणार आहे. कोणालाही जामीन राहू नये. इतरांचा विचार न करता बोलण्याच्या वृत्तीने जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे.
आज ग्रहमान अनुकुल असल्याने खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल.
आज चंद्रबल लाभल्याने स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात कामगारांना कितीही सवलती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
आजचे ग्रहयोग पाहता व्यवसायात खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आनंदी उत्साही रहाल. नवीन स्थावर घेण्यासाठी प्रयत्नात रहाल.
आज दिनमान समिश्र फलदायक आहे. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. नोकरी धंद्याच्या ठिकाणच्या उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल.
आज प्रतिकूल ग्रहमान असल्याने परदेशगमना साठी अडचणी उद्भवतील. नोकरी व्यवसायात तुमच्या समोरचा माणूसही तेवढाच तुल्यबळ असल्यामुळे मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल.
आज चंद्र शनि योगात नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील.
आज चंद्रबल लाभल्याने रोजगारात कामाचा दर्जा वाढेल. इतरांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. लोकांशी संवाद साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्याना आदर वाटेल.
आज अनुकूल चंद्र भ्रमणात स्वत:ची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम रहाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल.
आज शनि चंद्र युती प्रतिकूल परिणाम देणारी आहे. लांबच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील.
आज चंद्र योग अनिष्ट स्थानात होत असल्याने तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. राजकारणी लोकांना आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल.
संबंधित बातम्या