Today Horoscope 6 May 2024 : चंद्रभ्रमणामुळे जुळून येणार ३ विशेष योग, या राशीचे उजळणार भाग्य? वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 6 May 2024 : चंद्रभ्रमणामुळे जुळून येणार ३ विशेष योग, या राशीचे उजळणार भाग्य? वाचा राशीभविष्य!

Today Horoscope 6 May 2024 : चंद्रभ्रमणामुळे जुळून येणार ३ विशेष योग, या राशीचे उजळणार भाग्य? वाचा राशीभविष्य!

Published May 06, 2024 08:24 AM IST

Today Horoscope 6 May 2024 : आज ६ मे २०२४ सोमवार रोजी, चंद्रभ्रमणामुळे आज सरस्वतीयोग, लक्ष्मीयोग त्याचबरोबर ग्रहणयोग घटीत होत आहेत. या योगामुळे १२ राशींवर काय परिणाम होईल?

आजचे राशीभविष्य ६ मे २०२४
आजचे राशीभविष्य ६ मे २०२४

आज शुक्र अस्त होणार आहे. शिवरात्रीचा चंद्र मीन राशीतून बुधाच्या नक्षत्रामार्गे संक्रमण करणार असून मंगळ, बुध,राहु,नेपच्युनशी संयोग करीत आहे. चंद्रभ्रमणामुळे आज सरस्वतीयोग, लक्ष्मीयोग त्याचबरोबर ग्रहणयोग घटीत होत आहेत. या योगामुळे १२ राशींवर काय परिणाम होईल? आणि या राशींना आजचा दिवस कसा जाईल? वाचा आजचे राशीभविष्य.

मेषः 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज शुभ स्थानातील ग्रहयोग पाहता व्यवसायात खूप काम कराल. भविष्यात त्याचा लाभही तुम्हाला मिळणार आहे. दिवसभर आनंदी उत्साही राहाल. नवी संपत्ती खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी लोकांचे सहकार्य लाभेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी जुळून येतील. त्यांच्यासोबत गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय घेण्याचे टाळावे.

वृषभः 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आज चंद्रबल उत्तम असेल. दिवसभर आनंदी वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. इतरांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. लोकांशी संवाद साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्याना तुमचा आदर वाटेल. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल.

मिथुन: 

आज चंद्रभ्रमण आणि ग्रहमान अनुकुल असल्याने मिथुन राशीसाठी दिवस उत्तम जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे लोकांच्या मनात स्थान निर्माण कराल. गोड बोलून रखडलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाल. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर समाजात तुमचा प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. भविष्याच्या दृष्टिकोनातून कामाची उत्तम अंमलबजावणी कराल.

कर्क: 

कर्क राशीच्या लोकांसाठी आज चंद्र-मंगळ योग जुळून येत आहे. या योगाच्या सहकार्याने तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल. उद्योग-व्यवसायात कामगारांना कितीही सवलती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मनातील काहीही हातचे राखून न ठेवता मोकळ्या निर्भिड स्वभावाबद्दल तुम्ही प्रसिद्ध व्हाल. अडचणीच्या काळात धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल.

सिंहः 

सिंह राशीच्या लोकांसाठी आज राहु चंद्र योग तयार होत आहे. या योगात आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. अनावश्यक खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. करियरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. हातात घेतलेले कोणतेही संशोधन चांगले कराल. क्षणिक फायद्यासाठी खोट्याचा किंवा नको त्या गोष्टीचा आधार घेऊ नका. अशा गोष्टी तुम्हाला पुढच्या काळात गोत्यात आणू शकतात.

कन्या: 

कन्या राशीसाठी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. आज ग्रहयोग अनुकुल असल्याने लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदरपूर्वक दरारा निर्माण कराल. घरातील शांतता भंग होऊ शकते.अनेक दिवसांपासून सुरु असलेले वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. नोकरीच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा वेग वाढेल. खूप दिवसांपासून अडलेली ऑर्डर हातात पडेल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल.

तूळ:

तूळ राशीच्या लोकांसाठी आज ;लक्ष्मी योग जुळून येत आहे. आज लक्ष्मीयोगात खूप दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. परदेशी प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. घरामध्ये तरुण वर्गाची ये जा राहील. स्वभावातील तापटपणा आवरावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला योग्य न्याय द्याल.

वृश्चिकः 

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आज चंद्राची स्थिती लक्षात घेता नोकरीत नवीन योजनेवर लक्ष केंद्रित कराल. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहीलेली कामे आज पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील जुन्या समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यास प्रगती होऊन आर्थिक वाढ होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून मोलाचे सहकार्य मिळेल. काही ठिकाणी जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

धनु:

धनु राशीच्या लोकांसाठी आज चंद्र योग अनिष्ट स्थानात होत असल्याने तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. राजकारणी लोकांना आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. अवजड यंत्रावर काम करताना सांभाळून रहावे. तुमच्या थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल.

मकर:

मकर राशीतील लोकांसाठी आज चंद्रभ्रमण अनुकूल असणार आहे. आज अनुकूल चंद्र भ्रमणात स्वत:ची मते बिनधास्त मांडून आपल्या मतावर ठाम राहाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे कोड्याचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. जनमत जिंकण्यासाठी सर्वकाही पणाला लावाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात येतील आणि त्या राबवण्यासाठी अतोनात कष्ट कराल. जवळच्या प्रवासाचे आखाल.

कुंभ:

कुंभ राशीच्या लोकांसाठी आज प्रतिकूल ग्रहमान असल्याने परदेशगमनसाठी अडचणी उद्भवतील. नोकरी-व्यवसायात तुमच्या समोरच्या प्रतिस्पर्धीचे तितकेच तुल्यबळ असल्यामुळे मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्यवेळी समज द्यावी लागेल. आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल.

मीन:

मीन राशीच्या लोकांसाठी आज चंद्रबल अनिष्ट आहे. समोरच्या माणसाच्या गूढ वागण्याचा काहीसा त्रास होणार आहे. कोणत्याही बाबतीत कोणालाही जामीन राहू नये. कधी कधी इतरांचा विचार न करता बोलणे झाल्यामुळे दुसऱ्यांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते पटणार नाहीत. त्यामुळे घरात वादविवाद होण्याची

Whats_app_banner