Today Horoscope 6 August 2024 : आज चंद्र सिंह राशीतुन आणि मघा नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. वरियान योग आणि बालव करण राहील. चंद्राचा शुक्र, बुधाशी युतीयोग होत असुन राजयोग आणि बुधादित्य योग घटीत होत आहे. कसा जाईल आजचा दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!
आज वरियान योगात आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे. त्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपणास आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. परमेश्वरावर विशेष आस्था निर्माण होईल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. लेखन प्रकाशित होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील.
शुभरंग: भगवा
शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०४, ०६.
आज चंद्र शुक्र योगात प्रयत्न यशस्वी ठरतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घेण्यात आघाडीवर राहिल्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. कोणावर विसंबून राहिलात तर मात्र तुमचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल.
शुभरंग: भगवा
शुभदिशा: आग्नेय.
शुभअंकः ०२, ०७.
आज चंद्र बुध युतीयोग करीत असुन वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांनी काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायात इतरांबरोबर सौजन्य दाखवल्यामुळे तसेच सहकार्यही तुम्हाला मिळेल. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्म विश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल.
शुभरंग: पोपटी
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०५, ०९.
आज चंद्रबल अनिष्ट असल्याने आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांनी मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. हप्ते फेडताना त्रास होईल. व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. कुटुंबा तील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदारा सोबत दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारानिमित्त प्रवास होईल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा.
शुभरंग: पिवळा
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०७.
आज वरियान या शुभ योगात अनुकुल स्थिती राहणार आहे. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. उत्तम कल्पना शक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची दाद चांगली मिळेल. आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलां कडुन समाधान मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेमंद सिद्ध होईल.
शुभरंग: लाल
शुभदिशा: पूर्व.
शुभअंकः ०४, ०७.
आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात दिनमान आपणास काहीस त्रासदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहिल. जवळच्या मित्राच्या भरवशावर रहाल परंतु लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. व्यापार व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. तुमच्या स्वभावा तील लहरी पणा थोडा इतरांना जाचकच होणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता. आहे. आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा.
शुभरंग: हिरवा
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०३, ०५.
आज चंद्र शुक्र संयोगात मनाला समाधान लाभेल अश्या अनेक घटना घडतील. भावंडे मदत करतील. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल. मानधनात वाढ होईल. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठया प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. आपल्या इच्छे प्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणी मधील वादविवाद संपुष्टात येतील. मनोरंजन करण्याकडे कल राहील.
शुभरंग: पांढरा
शुभदिशा: आग्नेय.
शुभअंकः ०२, ०७.
आज चंद्र बुध युतीयोगात व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामाचा दर्जा सुधारेल. समाजकारणाची आवड असल्यामुळे जन मानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम रहाणार आहात. कामाचीगती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदाराचे नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल.
शुभरंग: तांबडा
शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०४, ०८.
आज चंद्र अनुकूल असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही राहाल. मित्रमैत्रिणीं कडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. संततीकडून शुभ संदेश मिळतील. समाधानकारक दिनमान असेल.
शुभरंग: पिवळा
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०७.
आज बालव करणात व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. अन्यथा तोट्याचे प्रमाण वाढेल. अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. उतावीळ पणा बाजूला ठेऊन पोक्त विचार करून कामाची आखणी करा. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे. परदेशी व्यवहारअसणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. राजकीय सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. मित्रमंडळींचे व कुटुंबा तील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल.
शुभरंग: जांभळा
शुभदिशा: नैऋत्य.
शुभअंकः ०५, ०९.
आज वरियान योगात व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजी पणा अंगलट येण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल. भावंडांशी वाद संभवतात. कागदोपत्री करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल. अडचणीत आणणारा दिवस आहे. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरक पणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल.
शुभरंग: निळा
शुभदिशा: पश्चिम.
शुभअंकः ०१, ०८.
आज अनिष्ट चंद्रभ्रमणामुळे आपल्या स्वभावात चंचलता निर्माण होईल. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापट पणा वाढेल. अविचार महागात पडेल. व्यवसायात भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड जाईल. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होतील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल. व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. व्यापार व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. व्यवहार करताना जपून करावेत. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे.
शुभरंग: पिवळा
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०७.