Todays Horoscope 5 May 2024: चंद्रभ्रमणाने आजचा रविवार बनणार खास; घडणार परदेशवारी! वाचा आजचे राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Todays Horoscope 5 May 2024: चंद्रभ्रमणाने आजचा रविवार बनणार खास; घडणार परदेशवारी! वाचा आजचे राशीभविष्य

Todays Horoscope 5 May 2024: चंद्रभ्रमणाने आजचा रविवार बनणार खास; घडणार परदेशवारी! वाचा आजचे राशीभविष्य

Published May 05, 2024 10:57 AM IST

Todays Horoscope 5 May 2024: आज चंद्र मीन राशीतून आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. अहोरात्र वैधृती आणि विष्कंभ योग असून, कौलव व गज करण आहे.

चंद्रभ्रमणाने आजचा रविवार बनणार खास; घडणार परदेशवारी! वाचा आजचे राशीभविष्य
चंद्रभ्रमणाने आजचा रविवार बनणार खास; घडणार परदेशवारी! वाचा आजचे राशीभविष्य

Todays Horoscope 5 May 2024: शास्त्रानुसार आज प्रदोष दिन आहे. यामध्ये चंद्र मीन राशीतून आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. अहोरात्र वैधृती आणि विष्कंभ योग असुन कौलव व गज करण आहे. त्यामुळे आजचा ५ मे रविवारचा दिवस नेमका कसा असणार? कोणत्या राशीला फायदा होणार आणि कोणत्या राशीला नुकसान होणार याबाबत जाणून घेऊया.

मेष

आजचा दिवस मेष राशीसाठी संमिश्र असेल. आज चंद्रबल पाहता आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. कोणाकडूनही पैसे उधार घेताना विचार करावा लागेल. उधारीचे परतफेड करताना त्रास होईल. व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी, त्याचा धैर्याने सामना कराल. विवाहित लोकांना सामंजस्यपणे वागावे लागेल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या दुहेरी वागण्याचा मनस्ताप होईल.

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज वैधृती योग जुळून येत आहे. त्यामुळे व्यवसायात आर्थिक लाभ घडतील. नवीन कार्य सुरु करण्याच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. अनपेक्षितपणे घडलेली एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामात चांगली सुधारणा होईल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा सुधारेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम रहाणार आहात.

मिथुन

मिथुन राशीमध्ये आज विष्कंभ योग जुळून येत आहे. त्यानुसार व्यवसायात अती उत्साहीपणाने कोणताही निर्णय घेणे टाळा. व्यवसायात निष्काळजीपणा नुकसानीचा ठरु शकतो. पूर्वी केलेली आर्थिक गुंतवणूक व्यावसायिकदृष्टीने फायदेशीर ठरेल. घरगुती समारंभासाठी वेळ द्यावा लागेल. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. कायदेशीर कागदोपत्री करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घेणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या.

अक्षय्य तृतीयेला या ३ राशींच्या लोकांना लागणार बंपर लॉटरी, लक्ष्मीच्या कृपेने पडू शकतो पैशांचा पाऊस

कर्क

कर्क राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज चंद्र अनुकूल असल्याने कामात पूर्ण लक्ष केंद्रित कराल. दिवसभरत धाडसी निर्णय घ्याल. अचानक धनलाभाचा योग जुळून येत आहे. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक आयुष्यातील मतभेद दूर होऊ शकतील. व्यापारात आर्थिक फायदा होईल. कामात भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशवारी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत .

सिंह

आज प्रदोष दिनी व्यवसायात व्यवहाराची सांगड योग्यरित्या घातली नाही, तर नुकसान होऊ शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. मोठे आर्थिक लाभ होतील. विवाहित लोकांच्या आयुष्यात अचानक काही घटना घडू शकतात. उतावीळपणा बाजूला ठेऊन विचारपूर्वक एखाद्या कामाची आखणी करा. आर्थिक गुंतवणूक करायला दिवस चांगला आहे. कुटुंबातील लहान सदस्यांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरणार आहे.

कन्या

कन्या राशीतील लोकांना आज कौलव करणात प्रयत्नांना यश येईल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. त्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे कौतुक होईल. कोणावर पटकन विश्वास ठेऊ नका. अन्यथा नुकसानाचा सामना करावा लागेल. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे.

तूळ

चंद्राच्या संक्रमणामुळे तूळ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस चांगला आहे. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. परदेशी जायला इच्छुक असणाऱ्यांनी ठाम निर्णय घेण्याची गरज आहे. व्यवसायात इतरांबरोबर सामंजस्य दाखवल्यामुळे तुम्हालाही सहकार्यही मिळेल.

Lucky Sign On Palm : नशीबवान लोकांच्या हातात असते अशी खूण; वयाच्या ३५ व्या वर्षीच होतात मालामाल

वृश्चिक

वृश्चिक राशीतील लोकांना आज अनिष्ट चंद्रभ्रमणामुळे स्वभावात चंचलता जाणवेल. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिडचिड वाढेल. भागीदारीच्या व्यवसायात एकमेकांशी मतभेद होतील. अशावेळी शांत राहाणे फायद्याचे ठरेल. अचानक दूरच्या प्रवासाचे योग जुळून येतील. वडिलोपार्जित संपत्तीसंबंधी वाद निर्माण होतील.

धनु

धनु राशीसाठी आज चंद्रबल उत्तम असल्याने आत्मविश्वासात वाढ होईल. दिवसभर मन प्रसन्न राहील. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. अचानक झालेली परदेशवारी खूप फायदेशीर ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या सांगायचे झाले तर, मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे. त्यासाठी उत्तम मानसिक तयारी ठेवावी लागेल. समाजात प्रसिद्धीचे योग जुळून येतील. आरोग्याच्या लहान लहान तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

मकर

मकर राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल. प्रतिकूल चंद्रभ्रमणात आजचा दिवस काहीस त्रासदायक ठरणार आहे. मन उदास असल्याने कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहील. जवळच्या व्यक्तीवर अवलंबून राहूनसुद्धा लाभ मिळणार नाही. दिवसभरात थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. उद्योग व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. तुमच्या स्वभावातील लहरीपणाचा थोडा इतरांना त्रास होणार आहे.

कुंभ

कुंभ राशीतील लोकांना आज वैधृती योगामुळे मानसिक समाधान लाभेल. विविध सकारात्मक घटना घडतील. भावंडांकडून हवी असलेली मदत मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक गोष्टीत जास्त मन घालाल. मन प्रसन्न राहिल्याने उपासनाही चांगली होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल.

मीन

मीन राशीसाठी आज चंद्रभ्रमण शुभ असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात चांगले बदल होणार आहेत. दिवसभरात अनुकुल स्थिती राहणार आहे. प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. उत्तम कल्पनाशक्तीमुळे कलाकारांना वाव मिळणार आहे.

Whats_app_banner