आज बुधवार ५ मे २०२४ रोजी चंद्राचा रवि, बुध, शुक्र, गुरू आणि हर्शल सोबत संयोग होत आहे. त्यातून बुद्धादित्य योग घटित होत आहे. या योगात आजचा दिवस तुम्हाला कसा जाणार हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.
आज चंद्रबल उत्तम लाभल्याने कौटुंबिक आयुष्यात सुख समृद्धी येईल. मेहनतीच्या जोरावर कार्यक्षेत्र नावलौकिक मिळवाल. आज मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात.
आज चंद्र हर्शल युती योगात अनपेक्षित फळे मिळण्याची शक्यता आहे. चंद्रभ्रमण हे अशुभ स्थानातून होत आहे.व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा.
आज गजकेसरी योगात नवीन कामकाज सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल.
आज चतुष्पाद योगात हा कलह उत्पन्न होणारा योग आहे. देवाणघेवाणीपूर्वी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. वाद घालू नका. खाजगी आयुष्यात मोठ्या निर्णयात कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही.
आज गुरू चंद्र योगात घरात मंगलकार्य, धार्मिक कार्य घडतील. व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार कराल. जादा भांडवलाची गरज वाटेल.
आज गुरूशी होणारा योग पाहता आपणास शुभअशुभ अशी समिश्र स्वरुपाची फळे मिळतील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल.
आज हर्शल-चंद्र योगात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. पैशांची बचत करा. कौटुंबिक शांतता राखण्यास प्रयत्न कराल.
आज सुकर्मा योगात व्यापारात नविन प्रकल्प स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल.
आज गुरू चंद्राशी संयोग करतोय. चांगल्या संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. करिअरची गती काहीशी कमी होतांना दिसेल. नोकरीत नेहमीपेक्षा अधिक काम करावे लागेल.
आज चंद्र गुरूशी योग करीत आहे. तुमचा राशीस्वामी शनि उत्तम स्थितीत आहे. झेपणारे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल.
आज चंद्रबल अनिष्ट-अशुभ परिणाम देईल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला लगाम घाला.
आज गुरू चंद्र योगात आपणास दिनमान उत्तम राहील. पित्यापासून अथवा वडिलधाऱ्या व्यक्तीपासून आर्थिक लाभ होतील. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत.
संबंधित बातम्या