Todays Horoscope 4 September 2024: आज भाद्रपद मासारंभ आणि चंद्रदर्शनाचा योग आहे. बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे. चंद्रमा सिंह आणि कन्या राशीतुन तर उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातुन गोचर करणार असून साध्य योग व बालव करण राहील. चंद्राचा शुक्र केतुशीही संयोग होत असुन राजयोग आणि ग्रहणयोग घटीत होत आहे. हा योग कसा फलद्रुप होईल! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!
मेष: आज चंद्र केतु युतीयोगात आपली कामे करून घेण्यासाठी एखादे वेळी पडती बाजू घेतली तरी चालणार आहे. परदेशी गोष्टी खरेदीचे योग येतील. थोडी स्वार्थी वृत्ती ठेवणार आहात. घरामध्ये तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. आर्थिक निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतील. दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला बरोबर लागणार आहे. पूर्ण स्वार्थ व स्वार्थ त्याग अशा दोन पराकोटीच्या भावनांना सामोरे जाणार आहात. समानसिक स्वास्थ सांभाळा. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्ज प्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते.
शुभरंगः केसरी
शुभदिशाः दक्षिण.
शुभअंकः ०२, ०९.
वृषभ: आज शुक्र चंद्र राजयोग घटित होत असल्याने तुमच्या कामाचा वेग आणि धाडस वाखाणण्यासारखे असेल. व्यवहारात कोणत्या वेळी कसे निर्णय घ्यावे याची जाण येईल. धंद्यात चांगली प्रगती कराल. लहानात लहान होऊन आणि मोठ्यात मोठे होऊन रमून जाल. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. आरोग्याच्या थोडयाफार समस्या उद्भवतील. परिवारातून शुभ संदेश मिळतील. कुटुंबासोबत दुरवरच्या प्रवासाचं नियोजन कराल.
शुभरंग: गुलाबी
शुभदिशा: वायव्य.
शुभअंकः ०४, ०६.
मिथुन: आज चंद्र केतु संयोगात व्यवसायात कष्ट जास्त पण त्यामानाने पैसा मात्र लगेच दृष्टी पडणार नाही. कलाकाराना आपली कला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळेल. उत्तम कलाकृतीसाठी कौतुकास पात्र ठराल. फायदा तोटा बाजूला ठेवला तरी धंद्यामध्ये तुमच्या बुद्धीची झलक आणि योग्य समयसूचकता दिसून येईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वाढविवाद मात्र टाळावे. आर्थिक बाबतीत लाभाच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील.
शुभरंगः हिरवा
शुभदिशाः उत्तर.
शुभअंकः ०३, ०६.
कर्क: आज बालव करणात तुमच्याकडे चांगुलपणा असला तरी कधी कधी तुमचे वागणे सहन शक्तीच्या पलिकडे राहील. आपल्या हातून घडलेली एखादी चूक प्रांजळपणे कबूल करून तुम्ही रिकामे होणार आहात. फाजील आत्मविश्वासामुळे तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची कला नजरेत भरण्यासारखी समोर येईल. घरामध्ये स्फूर्तीदायक वातावरण निर्माण होईल. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल.
शुभरंगः पांढरा
शुभदिशाः वायव्य.
शुभअंकः ०२, ०६.
सिंहः आज चंद्र शुक्र संयोगात प्रत्येक काम फत्ते करणार आहात. संयमाची कसोटी तुम्हाला सांभाळावी लागेल. प्रेमळ आणिपरोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचे नियोजन केले तरी त्याची कार्यवाही न केल्या मुळे कामे उलटपालट होऊन जातील. रागाचा पारा एकदम चढल्यामुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.
शुभरंगः लालसर
शुभदिशाः पूर्व.
शुभअंकः ०५, ०९.
कन्या: आज बुध राशीपरिवर्तनात नवीन चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी बदलाचे योग आहेत. व्यवसायात दुसरा एखादा व्यवसाय चालू करण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. नोकरी ठिकाणी वातावरण आनंदी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. त्यामुळे कामाला आपोआपच गती येईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल. दुरवरचे प्रवास लाभदायक भौतिक सुख उत्तम मिळेल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे.
शुभरंगः पोपटी
शुभदिशाः उत्तर.
शुभअंकः ०२, ०७.
तूळ : आज चंद्र शुक्र योगात समाजामध्ये पुढारीपण मिळण्याची ताकद तुमच्याकडे येईल. अविचाराने घेतलेला कोणताही निर्णय आर्थिक व्यय होण्यासाठी कारणीभूत ठरेल. परदेशगमनाचे योग येतील. तुमचा धाडसी स्वभाव उफाळून वर येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण होईल. बौद्धीक क्षेत्रात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. पाठीची दुखणी डोके वर काढतील. व्यायाम आणि औषधोपचार या दोहोंची साथ मिळेल. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न सफलदायक ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. हितशत्रु आणि विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल. व्यापार रोजगारात अनुकूल असा प्रतिसाद मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.
शुभरंग: भगवा
शुभदिशा: आग्नेय.
शुभअंकः ०२, ०४.
वृश्चिकः आजच्या चंद्र गोचरात व्यापारात विवाहेच्छूकांचे विवाह ठरतील. जोडीदार उत्तम आणि सुसंस्कृत मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तेवढाच खर्चिकपणाही वाढेल. अंधश्रद्धा ठेवण्यापेक्षा डोळसपणे एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागेल. व्यवसायात सर्व कामे एकट्याने करण्यापेक्षा योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन मनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा. प्रवासात विशेष काळजी घ्यावी लागेल.
शुभरंग: केसरी
शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०४, ०७.
धनुः आज ग्रहणयोग अनुकुल असल्याने जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. आपल्या स्वतंत्र विचाराचा अभिमान बाळगाल परंतु सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. स्थावर इस्टेटी संबंधी अचानक काही समस्या उद्भवण्याची शक्यता. व्यवहार आणि भावना या स्वतंत्र गोष्टी आहेत. स्वत:ची कामे स्वतःच केलेली बरी पडतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडुन समाधान मिळेल. आत्मविश्वास वाढीस लागल्याने लाभाचा दिवस आहे.
शुभरंग: पिवळसर
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०६.
मकरः आज चंद्र केतु योगात दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. प्रकृती स्वास्थ्यात सुधारणा झाली तरी अचानक काही तक्रारी उद्भवल्यामुळे मन:स्वास्थ्य मिळणार नाही. घरात चैनीच्या गोष्टी खरेदी केल्यामुळे खर्चात वाढ होईल. दिनमान कामाच्या दृष्टीकोनातून कष्टदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक हानीची शक्यता आहे. शेअर्समधील गुंतवणूक लांबणीवर टाकणेच उत्तम राहील.
शुभरंगः निळा
शुभदिशाः नैऋत्य.
शुभअंकः ०४, ०८.
कुंभः आज साध्य योगात आपणास मानसिक अवस्था दोलायमान रहाणार असली तरी पूर्वीचा अनुभव तुम्हाला असलेले ज्ञान आणि धडाडी यांच्या जोरावर सर्व गोष्टी तडीस न्याल. घरामध्ये अचानक एखाद्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल. भाग्याची साथ चांगली मिळेल. एखादी गोष्ट व्हावी अशी इच्छा असेल ती पूर्ण होण्याचा काळ आहे. त्यामुळे मूड चांगला राहील. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.
शुभरंग: जांभळा
शुभदिशा: नैऋत्य.
शुभअंकः ०४, ०७.
मीनः आज चंद्राचा शुक्राशी योग होत आहे. धार्मिक गोष्टींमध्ये पैसा खर्च कराल. आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. संकटाशी टक्कर देऊन आपले ध्येय गाठण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आज कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. नवीन कल्पनांच्या जोरावर बरेच काही साधून जाल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. मित्रमंडळींचे सहकार्य लाभणार आहे.
शुभरंग: पिवळा
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०७.