मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 4 May 2024 : चंद्रभ्रमणाने जुळून येणार २ विशेष योग; या राशींचे उजळणार नशीब, वाचा राशीभविष्य!

Today Horoscope 4 May 2024 : चंद्रभ्रमणाने जुळून येणार २ विशेष योग; या राशींचे उजळणार नशीब, वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 04, 2024 09:27 AM IST

Today Horoscope 4 May 2024 : आज ४ मे २०२४ शनिवार रोजी, चैत्र कृष्ण एकादशी तिथी असून, आजचा दिवस कसा जाईल? किती लाभ व संधी मिळतील? जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

राशीभविष्य ४ मे २०२४
राशीभविष्य ४ मे २०२४

आज शनिवार ४ मे रोजी, चैत्र कृष्ण एकादशी असून, पूर्वभाद्रपद नक्षत्र आणि ऐंद्र योग आहे. आज चंद्र कुंभ राशीनंतर मीन राशीत संक्रमण करणार आहे. बव करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. परंतु यामुळे कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये. इतरांच्या कामात ढवळाढवळ करणे टाळावे. सामाजिक आणि धार्मिक कामात हातभार लागेल. अनावश्यक खर्च होईल. मनात योजिलेले काम पूर्णत्वास जाईल. चांगली बातमी कानावर पडेल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. प्रकृती थोडी मऊ असेल. अचानक धनलाभ होईल. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल. कोणतेही काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणे फलदायी ठरेल. कोणत्याही क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. मुलांकडून शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मनोबल वाढून त्याचा सकारत्मक फायदा तुमच्या कामावर होईल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. दिवसभर आनंदी वातावरण असेल. व्यावसायिकांना अनेक आर्थिक लाभ होतील. मोठे प्रकल्प मिळवण्याच्या नादात लहान लहान प्रोजेक्ट हातातून जाऊ देणे नुकसानीचे ठरेल. जोडीदारासोबत रोमँटिक मूड असेल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठीसुद्धा आजचा दिवस चांगला असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ खूष होतील. याचा फायदा तुम्हाला भविष्यात जाणवेल. तुमच्या मधुर वाणीने सर्वच प्रभावित राहतील. गुंतवणूक करताना जास्त लोभ करणे टाळावे. कुटुंबातील सदस्यांशी उत्तम संवाद साधला जाईल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल.

सिंह

सिंह राशीसाठी आजचा दिवस विविध घडामोडींचा असेल. नोकरदार वर्गातील काहींची बदली होण्याची शक्यता आहे. काहीजण फिटनेसप्रेमी बनून जिम जॉईन करु शकतात. महिलावर्गाचे ऑफिस इव्हेन्टमुळे पैसे खर्च होतील. आई वडिलांकडून धनलाभ होईल. ऑफिसमध्ये महत्वाची जबाबदारी मिळू शकते. एकंदरीत दिवस धावपळीचा असणार आहे.

कन्या

कन्या राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. बौद्धिक क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कानाने ऐकल्याशिवाय कोणत्याही गोष्टींवर पटकन विश्वास ठेऊ नका. अन्यथा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल. तुमच्या कला कौशल्यांना वाव मिळेल. विविध मार्गाने धनलाभ होईल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. दिवसभर मनोबल उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होऊन मार्गदर्शन लाभेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत जुळवून घेण्याचा अतोनात प्रयत्न कराल. संपत्तीच्या कायदेशीर वादात यश मिळेल.

वृश्चिक

आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रगतशील असेल. मनात ठरवलेली कार्ये पूर्ण होऊ शकतात. कोणत्याही कामात घरातील वरिष्ठ लोकांचा सल्ला घेणे फलदायी ठरेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील. घरात वातावरण खेळीमेळीचे राहील. कुटुंबात वादविवाद टाळण्यासाठी लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा. घरातील विषयांवर बाहेरच्या व्यक्तींचे सल्ले घेणे महागात पडेल.

धनु

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी आनंददायी असणार आहे. नवनवीन लोकांचा संपर्क वाढेल. यातून उत्तम फायदा मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत नातेसंबंध सुधारतील. आज तुमच्यासाठी कलात्मक दिवस असेल. घरात सजावट करण्यावर लक्ष केंद्रित कराल. जोडीदारासोबत रोमँटिक मूड राहील. त्यामुळे नाते अधिक दृढ होईल.

मकर

मकर राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कामांमध्ये स्वारस्य वाढेल. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी लागेल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांवर आज शनिदेवाची चांगली कृपादृष्टी राहील. त्यामुळे अनेक लाभ मिळतील. व्यावसायिक लोकांनां कामात यश मिळेल. गुंतवणूक केल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. कमाई करण्याचे विविध नवे मार्ग खुले होतील. अचानक मोठा धनलाभ झाल्याने मन अगदी प्रसन्न राहील. तुमच्या मितभाषी स्वभावाचासुद्धा फायदा होईल. घरामध्ये आनंदी वातावरण राहील.

मीन-

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. व्यवसायात असलेली मंदी दूर होऊन आर्थिक फायदा होईल. वडिलोपार्जित संपत्तीचा कोर्टातील वाद मिटेल. त्यातून आनंदाची बातमी कानावर पडेल. कामाच्या ठिकाणी कोणावरही पटकन विश्वास ठेऊ नका. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel