मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 31 May 2024 : षडाष्टक योगात आज कोणाला होणार फायदा आणि कोणाला तोटा? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 31 May 2024 : षडाष्टक योगात आज कोणाला होणार फायदा आणि कोणाला तोटा? वाचा राशीभविष्य

May 31, 2024 07:05 AM IST

Today Horoscope 31 May 2024 : जोतिष शास्त्रानुसार, आज चंद्र केतू नक्षत्रासोबत षडाष्टक योगाची निर्मिती करत आहे. तर दुसरीकडे बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य ३१ मे २०२४
राशीभविष्य ३१ मे २०२४

आज शुक्रवार ३१ मे २०२४ रोजी चंद्र केतू नक्षत्रासोबत षडाष्टक योगाची निर्मिती करत आहे. तर दुसरीकडे बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या सर्वांमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मेषः 

आज विष्कंभ योगात चांगल्या संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. करिअरची गती काहीशी कमी होताना दिसेल. नोकरीत नेहमीपेक्षा अधिक काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठांकडून उपलब्ध होतील.

वृषभ: 

आज चंद्र केतु षडाष्टक योगात तुम्हाला शुभ अशुभ अशी समिश्र स्वरुपाची अनुभव येतील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. पगारवाढ होण्याचे योग जुळून येतील.

मिथुन: 

आज तैतील करणात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. विनाकारण खर्च टाळून भविष्यासाठी आर्थिक बचत सुरु करा. तुमच्या स्वभावातील सामंजस्यपणा कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. ज्येष्ठांचे निर्णय लाभदायक ठरतील.

कर्क: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने अंत्यत शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांना कौटुंबिक आयुष्यात सुख समृद्धी लाभेल. कामाप्रती असलेले प्रेम आणि जिद्दीमुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात नवी ओळख मिळेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल.

सिंह: 

आज विष्कंभ योगात तुमच्यासाठी दिवस उत्तम असणार आहे. वडीलांपासून अथवा ज्येष्ठ व्यक्तींपासून आर्थिक लाभ होतील. नोकरदारवर्गाला बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल रुचेल असेच वक्तव्य करा. घरात महागड्या वस्तूंची खरेदी कराल.

कन्या: 

आज बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव कन्या राशीवर असणार आहे. त्यामुळे तुमच्या कुवतीप्रमाणे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती सुधारेल. सोबतच मोठे आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. आणि त्यामुळे अनेक प्रतिष्ठित लोकांना भेटण्याची संधी मिळेल.

तूळ: 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने, अशुभ परिणाम दिसून येतील. पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला लगाम घाला. वैचारिक मतभेदामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होईल.

वृश्चिक: 

आज चंद्रबल उत्तम लाभल्याने नवीन कामकाज सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. एखाद्या बाबतीत ठोस निर्णय घेऊ शकाल. नोकरीत ठरविलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे गोंधळून जाल.

धनु: 

आज केतु-चंद्र षडाष्टक योगात घरामध्ये धार्मिक कार्य घडून येतील . व्यवसायात एखादा नवीन भागीदार जोडण्याचा विचार कराल. कार्यात अधिक भांडवलाची गरज वाटेल.

मकर: 

आज चंद्र राहुच्या नक्षत्रातून संक्रमण करणार असून या संयोगात अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे. चंद्रभ्रमण हे अशुभ स्थानातून होत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा.

कुंभ: 

कुंभ राशीसाठी आज वादविवाद उत्पन्न करणारा योग आहे. संपत्ती देवाणघेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. कोणाशीही वाद घालू नका. एखाद्या महत्वाच्या निर्णयात कुटुंबीयांची साथ लाभणार आहे. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून मतभेद करु नका.

मीन: 

आज चंद्र केतुशी संयोग करीत आहे. व्यापारात अधिक कमाई करण्यासाठी न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करा. एखाद्या गोष्टीत ठोस निर्णय घ्याल.

WhatsApp channel