Rashi Bhavishya Today 31 August 2024 : शनिप्रदोष दिनी महिन्याचा शेवटचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य-today horoscope 31 august 2024 daily rashi bhavishya in marathi astrological prediction for all zodiac signs ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Rashi Bhavishya Today 31 August 2024 : शनिप्रदोष दिनी महिन्याचा शेवटचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya Today 31 August 2024 : शनिप्रदोष दिनी महिन्याचा शेवटचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य

Aug 31, 2024 06:20 AM IST

Astrology prediction today 31 August : चंद्रमा राहु नेपच्युनशी संयोग करणार असून दिनमानावर शनिचा विशेष प्रभाव राहणार आहे. कसा जाईल महिन्यातील शेवटचा दिवस!

शनिप्रदोष दिनी महिन्याचा शेवटचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य
शनिप्रदोष दिनी महिन्याचा शेवटचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 31 August 2024 : आज शनिप्रदोष दिनी चंद्र कर्क राशीतुन आणि पुष्य नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. वरियान योग व गरज करण राहील. चंद्रमा राहु नेपच्युनशी संयोग करणार असून दिनमानावर शनिचा विशेष प्रभाव राहणार आहे. कसा जाईल महिन्यातील शेवटचा दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!

मेष: आज वरियान योग शुभ असल्याने व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो. विरोधकही शांत होतील. परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी इच्छुक असलेल्यांनी प्रयत्न करावेत. राजकारणात काम करणाऱ्यांना यश मिळेल. नशीबाचे पाठबळ लाभणार आहे. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बढ़ती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील.दुरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. साहित्यिक संपादन या बौद्धिक अधिष्ठान असणाऱ्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. मानधनात वाढ होईल. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक बाबतीत वाढ होईल.

शुभरंगः तांबडा

शुभदिशा: दक्षिण.

शुभअंकः ०२, ०८.

वृषभ: आज चंद्र राहु संयोग होत असुन काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. अतिरिक्त खर्च टाळावा आणि किरकोळ आजारांनाही गांभीर्याने घ्यावे. सोशल मीडिया चित्रपट यामध्ये मौल्यवान वेळ वाया घालवू नये. काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दिनचर्येत ध्यान योगा आणि व्यायामाचा समावेश अवश्य करावा. कामकाज किंवा रोजगार क्षेत्रात आज असंतोषाची भावना निर्माण होईल. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा. वादविवादातून मनस्ताप होईल. खर्चात वाढ होईल. कायदेशीर प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे.

शुभरंगः पांढरा

शुभदिशाः वायव्य.

शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: आज चंद्र नेपच्युन अनुकूल परिणाम देणारं आहे. परदेशाशी संबंधित कोणतीही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. परदेशात नोकरी करण्यास किंवा अभ्यास करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी किंवा कार्यरत व्यावसायिकां साठी अनेक संधी निर्माण होऊ शकतात. संधी ओळखून पुढे जावे लागेल. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळू शकते. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. मंगल कार्याचे नियोजन कराल. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. चंद्र ग्रहाच्या प्रभावामुळे उत्तम दिवस आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आजचा दिवस आपल्यास अत्यंत शुभ फलदायी ठरेल.

शुभरंगः हिरवा

शुभदिशाः उत्तर.

शुभअंकः ०३, ०५.

कर्कः आज चंद्र नेपच्युन योगात वडिलोपार्जित मालमत्ते बाबतचा जुना वादही मिटू शकतो. गुप्तपणे काम करत राहावे आणि यश मिळवावे. विरोधकांवर मात कराल. नेतृत्वगुण विकसित होईल. नवीन प्रकल्पांमध्ये सहज व्यवहार करू शकाल. कौटुंबिक जीवन खूप चांगले ठेवेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींची मान प्रतिष्ठा प्रतिभा वाढीस लागेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढ़ती व वेतनवाढीचा योग आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. नवीन समुहाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील. पती पत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. आरोग्य उत्तम राहील.

शुभरंग: गुलाबी

शुभदिशा: वायव्य.

शुभअंकः ०५, ०८.

सिंहः आज चंद्र राहु योगात आर्थिक दृष्टीकोनातून समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष दयावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. आर्थिक टंचाई निर्माण होतील. मनात नैराश्य निर्माण होईल. अविचारी निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. विचार पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. नोकरीत स्थान बदल होईल. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास निरर्थक ठरतील. नोकरीत स्थान बदल होईल. प्रेमप्रकरणात वितुष्ट निर्माण होऊ शकते. संततीविषयी चिंता निर्माण होईल. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. दुर्व्यसनांपासून सावध रहा.

शुभरंग: लालसर शुभदिशा: पूर्व.

शुभअंकः ०४, ०६.

कन्या : आज वरियान योगात कुंटुंबात सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षे प्रमाणे यश येईल. कार्यक्षमतेमुळे फायदा होईल. पालकांकडून भरपूर सहकार्य मिळेल. नवीन कार किंवा घर घेण्याचे धैर्य वाढवू शकाल. कार्यक्षेत्रात सबुरीने वाटचाल करा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षे प्रमाणे यश येईल. दिवसभर मन प्रसन्न राहिल. व्यापार उद्योगात फायदा होईल. खर्च मात्र विचार करून करा. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होईल. व्यापारात नवीन भागीदारासोबत नवीन प्रकल्पाची सुरुवात कराल.

शुभरंगः पोपटी

शुभदिशाः उत्तर.

शुभअंकः ०२, ०६.

तूळ : आज गरज करणात शुभफले मिळतील. कोणतेही काम करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाचे अधिक स्रोत विकसित करण्याच्या स्थितीत असाल. तुम्ही कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादही मिटतील. नवीन कार किंवा घर खरेदी करण्याची परिस्थिती होईल. पैसे चांगल्या कामांवर खर्च कराल. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. शासकीय सेवेत नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे.कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. भांवडाकडून मदत मिळेल.व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. लेखक कला क्षेत्रातील व्यक्तींना शासकीय मानसन्मान मिळेल. आजचा दिवस ठरविल्याप्रमाणे कामे पार पाडण्यात उपयुक्त असा आहे. आर्थिक लाभ होतील. उन्नतीकारक दिवस आहे. एकंदरित शुभ फलदायी दिवस राहील

शुभरंग: गुलाबी

शुभदिशा: पश्चिम.

शुभअंकः ०६, ०९.

वृश्चिक: आज वरियान योगात दिवसाची सुरुवात अनेक सकारात्मक गोष्टींनी होईल. भरपूर आर्थिक लाभ होईल. घरामध्ये चांगले वातावरण असेल आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार मनात येईल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सन्मान आणि लाभ मिळेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील जातकांना धन लाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. व्यापारात आकस्मिक लाभाचा योग आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. दुसऱ्याच्या कामात मात्र हस्तक्षेप करू नका. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या प्रकृतीच्या तक्रारी उद्भभवतील.

शुभरंग: नांरगी

शुभदिशा: दक्षिण.

शुभअंकः ०१, ०९.

धनुः आज चंद्र गोचरात प्रतिकूल असल्याने प्रतिकूलता जाणवेल. वैवाहिक जीवनाबद्दल थोडे सावध राहावे लागेल. जोडीदाराशी वारंवार मतभेद होतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत वाढवण्यासाठी कठोर परिश्रम कराल आणि त्याचे फायदे देखील मिळतील. गोड बोलण्याने बरीच कामे मार्गी लावता येतील. कामाच्या ठिकाणी ताणतणात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारात भागीदारा सोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहिल. मोठी आर्थिक मोठी आर्थिक हानी फसवणुक होण्याचे योगआहे. लक्ष्मीची अवकृपा रहिल. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. शारीरिक दृष्टीकोनातून मधुमेह पोटाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा. आर्थिक हानीची शक्यता वाटते. चिंता वाढविणारा दिवस असुन मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी.

शुभरंग: पिवळसर

शुभदिशा: ईशान्य.

शुभअंकः ०३, ०५.

मकर : आज गरज करणात कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन. आपल्या समोर नवीन व्यवसायाच्या प्रस्ताव येतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. आपल्याला आठवण येत असलेल्या पूर्वीच्या मित्र मैत्रिणींच्या आप्तेष्टांच्या गाठी भेटी होतील. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक जोडिदार भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. व्यवहार चातुर्य संयमी भूमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. कामाप्रती सजग रहा. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. सर्वच स्तरातील नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल.

शुभरंग: जांभळा

शुभदिशाः नेॠत्य.

शुभअंकः ०७, ०८.

कुंभ : आज राहु चंद्र नवमपंचम योगात कौटुंबिक तणाव निर्माण होईल. परंतु कोणाचेही बोलणे मनावर घेऊ नका आणि संयमाने काम करा. कुटुंबातील सदस्यांसोबत सलोख्याने रहा. पैशाअभावी कोणतेही काम थांबणार नाही. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रेम प्रकरणातील जुने मतभेदही दूर होतील. जीवन साथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वादविवाद होण्याची शक्यता आहे. शत्रु वरचढ पणा करण्याची शक्यता आहे. मनावर संयम ठेवून रहा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. नोकरीत वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. शारिरिक त्रास जुना आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिनमान आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्या. वैद्यकिय उपचारा वर खर्च होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: निळा

शुभदिशा: पश्चिम.

शुभअंकः ०५, ०७.

मीन : आज चंद्र अनुकूल असल्याने अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. नोकरीत प्रगतीकारक दिवस असुन नवीन चांगली संधी अथवा पदोन्नती होईल. आपण पूर्वी घेतलेल्या कष्टाचे फळ आपणास मिळेल. नविन मित्र भेटतील. दुसऱ्यावर सहज आपली छाप पडू शकेल. रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. मुलांच्या प्रगतीने मन समाधानी राहिल. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. कला क्षेत्रातील मनोरंजन विश्वातील मंडळीना उत्तम दिवस आहे. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. कुटुंबांवर वाहन घर खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य स्वास्थ उत्तम राहील. ज्येष्ठ व्यक्तिंच्या सहवास लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहिल.

शुभरंग: पिवळा

शुभदिशा: ईशान्य.

शुभअंकः ०३, ०५.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

विभाग