आज गुरुवार ३० मे २०२४ रोजी चंद्र शनीशी युती करत आहे. त्यामुळे आज वैधृती योग आणि बालव करण निर्माण होत आहे. तसेच सध्या ज्येष्ठ महिना सुरु असून आज या महिन्याची सप्तमी तिथी आहे. या सर्व घडामोडींमध्ये गुरुवारचा दिवस तुम्हाला कसा जाणार याबाबत जाणून घेऊया.
आज वैधृती योगात तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. तुमच्या कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. आर्थिक नियोजन मात्र उत्तम प्रकारे कराल.
आज बालव करणात स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण मानसिक अस्थिरता असू शकते.
आज चंद्रबल लाभल्याने विश्वासार्ह वातावरण राहिल. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल.
आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात भांवडांशी आपले मतभेद होऊ शकतात. तुम्ही मूळ सोशिक आहात परंतु प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. थोडेसे धूर्त संयमितपणा बरोबरच धोरणी राहाल.
आजच्या चंद्रभ्रमणात औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. नंतर काळजी करण्यापेक्षा आधीच काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा.
आज चंद्रभ्रमण लाभदायक असल्याने हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल.
आज वैधृती योगात भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजना आणि नियोजनानुसार काम करा. काही करण्याची खूप स्वप्ने रंगवली असतील. त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल.
आज उत्तम चंद्रबल पाहता आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. एक प्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल.
आज चंद्रबल अनिष्ट असल्याने प्रकृतीवर विपरित परिणाम होऊ शकतात. कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल पण त्यापासून आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल.
आज चंद्र शनिशी शुभ योग करत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील.
आज वैधृती योगात नवीन जबाबदारी मिळेल. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल.
आज शनि-चंद्र योगात आत्मविश्वास द्विगुणित होईल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज वादविवाद मागे सोडून प्रगतीची वाट धारावी लागेल.
संबंधित बातम्या