आज मंगळवार ३० एप्रिल रोजी, चैत्र कृष्ण षष्ठी असून, उत्तराषाढा नक्षत्र आणि साध्य योग आहे. आज चंद्र धनु राशीनंतर मकर राशीत संक्रमण करणार आहे. वणिज करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज व्यवसायात नवीन भागीदार जोडण्याचा विचार कराल. जादा भांडवलाची गरज वाटेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्त्रोत वाढेल. वैवाहीक जीवन सुखी राहील. आरोग्य उत्तम राहील.
आज नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. कमाई वाढेल. तुमची स्थिती उत्तम होईल. भावनेवर नियंत्रण ठेवा. नोकरी बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचण येईल. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल.
आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. यश निश्चित मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. आकस्मिक धनलाभ होईल. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पदप्राप्ती मानसन्मान वाढेल. कौटुंबीक सौख्य लाभेल.
आज व्यापाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनात सुख-समृद्धी येईल. उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. आकस्मिक लाभ होतील.
आज आर्थिक लाभ होतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. विलासी वस्तूंची खरेदी कराल. आपला आत्मविश्वास वाढेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणि संततीसौख्य उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील.
आज आर्थिक स्थिती उत्तम होईल. प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्काला आणण्याची संधी मिळेल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळणार आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल. भाग्यकारक घटना घडतील.
आज पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला लगाम घाला. वैचारिक भेदामुळे कौटूंबिक नात्यात दुरावा येऊ शकतो. व्यावसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
आज नोकरीत नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. धनवृद्धी होईल.
आज योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील. भावंडाची योग्य साथ मिळेल. नविन संधी मिळेल. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. रखडलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. यशस्वी व्हाल. मानधन वाढेल. कामाचे कौतुक होईल, मानसन्मान वाढेल.
आज कामांना गती येईल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोपाला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत.
आज ठोस निर्णय घेऊ शकाल. मेहनत कराल. कुटुंबात परस्पर मतभेद जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीसाठी उत्तम दिवस आहे. पदोन्नती व प्रगती होईल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. पद प्रतिष्ठा लाभेल.
आज कलह उत्पन्न होणारा योग आहे. देवाण घेवाणीपूर्वी कागदोपत्रे वाचा. वाद घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. कुटुंबात परस्पर दुरावा जाणवेल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. अतिरिक्त ताण जाणवेल.