Todays Horoscope 3 october 2024 : आज शारदीय नवरात्रारंभ अर्थात घटस्थापनेचा योग आहे. चंद्र कन्या राशीतुन हस्त नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. ऐंद्र योग व किस्तुघ्न करण राहील. चंद्रमा राहु नेपच्युनशी प्रतियोग योग करत आहे. कसा असेल आजचा दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!
मेष: आज चंद्र राहु योगात प्रतिकूल दिनमान राहील. आर्थिकबाबतीत थोडी अस्थिरता जाणवेल. जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. विपरित परिणाम दिसतील. बँकेत कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. काहीसा अडचणीत आणणारे दिनमान राहील. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उदभवेल. मोठे धाडसी निर्णय घेऊ नयेत. मित्रमैत्रिणीं बरोबर व्यवहार करताना जपून करा. जीवनसाथीसोबत वैचारिक पातळीवर मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारिक प्रकरणात जबाबदारी वाढणार आहे. आप आपसातील वाद समझदारीने मिटवा. भागीदारा सोबत वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा.
शुभरंगः नारंगी
शुभदिशाः दक्षिण.
शुभअंकः ०२, ०७.
वृषभः आज चंद्रगोचर शुभ असल्याने आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशासंदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. रोजगारात प्रगती होईल. जबाबदारी वाढणार आहे. आपले कर्तुत्व सिद्ध कराल. पराक्रम व साहसी वृत्तीत वाढ होईल. व्यापारात नवीन संधी सोडू नका. नोकरीत एका नव्या समुहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे फायदेशीर राहील. मुलांच्या बाबतीत चांगले संकेत मिळतील. व्यापारात नवीन योजना आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहेत.
शुभरंगः भगवा
शुभदिशाः पश्चिम.
शुभअंकः ०२, ०७.
मिथुन: आज चंद्र राहु योग करीत असल्याने शारिरिक स्वास्थ सांभाळा. अति कर्तव्यनिष्ठतेमुळे एखादे वेळी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात समस्या निर्माण होऊ शकते. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्या मुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. आपल्या व्यसनांना आवर घाला. शारिरिक व्याधीचा कामावर विपरित परिणाम होईल. अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यास कसरत करावी लागेल. व्यापारात प्रतिस्पर्थ्यासोबत आव्हान निर्माण होईल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. मित्रमैत्रिणीं सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावे. मनात असमाधान आणि असंतोष निर्माण होईल.
शुभरंगः पोपटी
शुभदिशाः उत्तर.
शुभअंकः ०४, ०८.
कर्क: आज चंद्र नेपच्युन योगात महत्त्वपूर्ण कार्यात विशेष यश येईल. जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यापार व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध घेतील. प्रेमीजनांना अनुकूल दिनमान आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वतःच करा. मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे. नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. मनोरंजनाकडे कल वाढेल. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष दया. नातेवाईक मित्रमंडळी यांच्या सह फिरण्याचा योग उत्तम आहे. अध्यात्माची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. धार्मिक कार्य करण्याची संधी मिळेल. धार्मिक व्यक्तिंच्या सहवास लाभेल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल.
शुभरंगः पांढरा
शुभदिशाः वायव्य.
शुभअंकः ०६, ०९.
सिंह: आजचं चंद्रभ्रमण पाहता तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. घरगुती उपयोगी वस्तु खरेदी कराल. सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण होतील. नवीन योजनेचा शुभारंभ होण्याचा योग आहे. व्यवसायात यश मिळेल. अनेक नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. नोकरदार पत्नीकडून सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होऊन नफ्यात वाढ होईल. दूरवरचे प्रवास आनंददायक होतील. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.
शुभरंगः लालसर
शुभदिशाः पूर्व.
शुभअंकः ०१, ०५.
कन्या: आज किस्तुघ्न करण असल्याने अपेक्षीत सफलता लाभणार नाही. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. जोडीदाराबरोबर मतभेद झाले तरी कोणतीही टोकाची भूमिका न घेतलेलीच बरी राहील. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. दिवस धगधगीचा आणि धावपळीचा राहील. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्या. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण कराल. निरर्थक कामात वेळ वाया घालवू नका. स्थावर मालमत्तेत काही अडचण येण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरी कायदयाचे वाद असतील तर सामोपचाराने मिटवा. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
शुभरंगः हिरवा
शुभदिशाः उत्तर.
शुभअंकः ०२, ०६.
तूळ : आज अनुकूल ऐंद्र योगात नशिबाची साथ लाभणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. अत्यंत अनुकुल दिवस आहे. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. कोणाचाही द्वेष तिरस्कार करू नका. नवीन योजना फायदेशीर ठरतील.व्यापारात काही नवीन भागीदारा सोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्य जोडीदारा कडून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगति होईल. बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत. आपला लौकिक सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कलाकारांना योग्य संधी मिळतील.
शुभरंगः गुलाबी
शुभदिशाः पश्चिम.
शुभअंकः ०२, ०७.
वृश्चिक: आज चंद्र भ्रमण अनुकुल राहिल. नवीन घर खरेदीचा योग आहे. सिनेमासृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील.आपल्या वस्तुची देख भाल कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करता येईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. संगीत कार व गायक वादक यांना संधी मिळेल. शेअर्स मधील गुंतवणूकीसाठी उत्तम दिवस आहे. मनातील शंका दूर ठेवाव्या लागतील. मुलांच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल.
शुभरंगः तांबूस
शुभदिशाः दक्षिण.
शुभअंकः ०७, ०९.
धनु: आज चंद्र नेपच्युन योगात रोजगारातील स्थिती सामान्य राहणार आहे. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. परंतु तुमच्या समतोल स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. तरूण तरुणीचे विवाह योग जुळतील. प्रेमप्रकरणात कुटुंबाच्या विरोधात जावून कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्रिय व्यक्तीबरोबर अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. आपल्या संशयीवृत्तीवर आवर घाला. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील चिंतेमुळे मन उदास राहील. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. कलाकारांना काही नवीन संधी मिळतील.महिला वर्गाचा आदर राखा. पती-पत्नीत वाद होणार नाही याची काळजी घ्या.
शुभरंगः पिवळसर
शुभदिशाः ईशान्य.
शुभअंकः ०३, ०७.
मकरः आज आज चंद्रबल लक्षात घेता आपल्या कार्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राही त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याची आज संधी आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल. आज आपल्या कामात उत्साह वाटणार आहे. बुद्धीचा वापर करुन पैशाची गुंतवणूक करा. उद्योग व्यवसायात विचार पुर्वक केलेली मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. प्रवास सुखकर व हितकारक ठरतील. सामाजिक मान सन्मान मिळेल.
शुभरंगः जांभळा
शुभदिशाः पश्चिम.
शुभअंकः ०४, ०८.
कुंभ: आज चंद्र राहु योग पाहता व्यक्तिगत समस्याचा प्रभाव कामावर राहिल. एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील. अशा चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल. शेअर्समधील गुंतवणूक नुकसानकारक होईल. काही अप्रिय घटनेमुळे त्रास सहन करावा लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानी बळा. नोकरीत दुसऱ्यावर रोष करू नका. वाईट संगती पासुन सावध रहा. घरातील मौल्यवान वस्तु गहाळ किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय रोजगारात मोठे परिवर्तन घडून देण्याची संभावनाआहे. आपले निर्णय चुकीचे ठरू शकतात. व्यसनी मित्रामुळे नुकसान होईल. व्यसनापासुन दुर रहा. मोठी आर्थिक गुंतवणुक करू नका. कर्ज घेणे देणे टाळा. आर्थिक नुकसान हानी संभवते. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष दया.
शुभरंगः निळा
शुभदिशाः नैऋत्य.
शुभअंकः ०४, ०८.
मीन: आज चंद्र नेपच्युन संयोग पाहता परदेशात नोकरीच्या संधी चालून येतील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारा साठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नकारात्मक विचार मात्र दूर ठेवा. रिअल इस्टेट जमीन जागा खरेदी विक्री करिता आजचा दिवस फायदेशीर ठरेल. महत्त्वपूर्ण निर्णय हे गुप्त ठेवा. व्यापारात आर्थिक दृष्ट्या प्रलंबित असणारी कामे पूर्णत्वास जातील. प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. पदप्राप्ती मानसन्मान मिळेल. पत्नीकडून सहकार्य आणि कुटुंबातील इतरां कडून प्रोत्साहन मिळेल. उर्जात्मक आणि उत्साही दिवस आहे. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल.
शुभरंगः पिवळा
शुभदिशाः ईशान्य.
शुभअंकः ०६, ०९.