Today Horoscope 3 May 2024 : आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, लक्ष्मी प्रसन्न होईल की खर्च वाढतील? वाचा राशीभविष्य!-today horoscope 3 may 2024 daily rashi bhavishya in marathi mesh to meen astrological prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 3 May 2024 : आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, लक्ष्मी प्रसन्न होईल की खर्च वाढतील? वाचा राशीभविष्य!

Today Horoscope 3 May 2024 : आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, लक्ष्मी प्रसन्न होईल की खर्च वाढतील? वाचा राशीभविष्य!

May 03, 2024 08:01 AM IST

Today Horoscope 3 May 2024 : आज ३ मे २०२४ शुक्रवार रोजी, चैत्र कृष्ण दशमी तिथी असून, आजचा दिवस कसा जाईल? किती लाभ व संधी मिळतील? जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

राशीभविष्य ३ मे २०२४
राशीभविष्य ३ मे २०२४

आज शुक्रवार ३ मे रोजी, चैत्र कृष्ण दशमी असून, शततारका नक्षत्र आणि ब्रम्हा योग आहे. आज चंद्र कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. वणिज करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष

आजचा दिवस मेष राशीसाठी संमिश्र असणार आहे. मन विचलित राहील. प्रकृती बऱ्यापैकी उत्तम असेल. प्रवासात थकवा जाणवेल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी दिवस सामान्य असेल. मुलांकडून फारशा अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. उद्योग-व्यवसायात चढ-उतार येतील.

वृषभ

आज वृषभ राशीसाठी दिवस चांगला असेल. प्लूटो आणि चंद्र यांच्या शुभयोगामुळे वातावरण आनंदमयी राहील. दिवसभर उत्साह जाणवेल. उधारी परत मिळेल. कर्जाची परतफेड कराल. एखाद्या कामात उत्साहाने पुढाकार घ्याल. मुलांसोबत संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवाल. राहुच्या प्रभावामुळे स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यर्थ्यांना फायदा होईल. व्यवसायात फायदा होईल.

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. चंद्रभ्रमणात चंद्राच्या अशुभ स्थानाने दिवस फारसा उत्साही नसेल. मनाविरुद्ध कामे होतील. जोडीदाराच्या दुहेरी वागण्याचा मनस्ताप होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. अडचणीच्या काळात निकटवर्तीयांची मदत मिळेल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना जाणकार व्यक्तींचा सल्ला घेणे फलदायी ठरेल.

कर्क

आज शनी आणि चंद्रयोग जुळून येत असल्याने घरात प्रेम मिळवण्यासाठी धडपडावे लागेल.त्यामुळे मानसिक अस्थिरता जाणवेल. नोकरदारवर्गाला कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. मुलांचे आणि जोडीदाराचे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. सरकारी कामात यश मिळेल.

सिंह

आज प्लुटो-चंद्र षडाष्टक योगात कोणताही मोठा निर्णय घेताना विचार करावा लागेल. चांगल्या कल्पक दृष्टीमुळे कलाकरांना नव्या संधी उपलब्ध होतील. जुनी दुखणी उद्भवतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. धार्मिक ठिकाणी भेट देण्याचा योग जुळून येईल.

कन्या

रागीट आणि अस्थिर स्वभावामुळे कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्राण पणाला लावून कष्ट कराल. वातावरण उत्साहवर्धक राहील. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ असेल.

तूळ

आजचा दिवस तूळ राशीसाठी उत्तम असेल. चंद्र आणि प्लुटोचा शुभयोग जुळून येत असल्याने वातावरण आनंदी राहील. तुमच्या कला कौशल्यांची लोकांना भुरळ पडेल. कामात उत्साह राहील. तरुण वर्गाला मनात असणारी व्यक्तीचा सतत सहवास लाभेल. उद्योग-व्यवसायात केलेली गुंतवणूक फलदायी ठरेल.

वृश्चिक

आज वृश्चिक राशीत ब्रह्म योग जुळून येत आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास फायदाच होईल. मात्र निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवणे टाळावे. कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कामाच्या आणि जबाबदारीच्या व्यापात शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल.

धनु-

धनु राशीत चंद्रबल उत्तम असल्याने लाभ होईल. शेअर मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्यांना व्यक्तींना यश मिळेल. व्यवसायात मोठे ग्राहक मिळतील. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन उत्साही राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. देवाची भक्ती कराल.

मकर

आज चंद्रबल उत्तम असल्याने सिव्हिल क्षेत्रातील व्यक्तींना याचा लाभ होईल. एखादया व्यक्तीवर प्रेम असेल तर त्यांच्या समोर भावना उघड करण्यासाठी दिवस चांगला आहे. कामात ऑफिसमधील लोकांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळाल.

कुंभ

व्यवसायिकांना भागीदाराची दुहेरी वागण्याचा त्रास सहन करावा लागेल. कामानिमित्त परदेशवारी होईल. आत्मविश्वास उत्तम राहील. हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण होतील. निकटवर्तीयांसोबत वाद निर्माण होऊ शकतात. मित्रांकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

मीन

मीन राशीसाठी आजचा दिवस प्रतिकूल असेल. मानसिक थकवा जाणवेल. कामात अडचणी येतील. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. झोप न झाल्यामुळे दिवसभर आळस जाणवेल. आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम विचारपूर्वक करावे लागेल.

 

Whats_app_banner