मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 3 June 2024 : जून महिन्याचा पहिला सोमवार ग्रह-नक्षत्राच्या बदलात कसा जाईल? वाचा आजचे राशीभविष्य

Today Horoscope 3 June 2024 : जून महिन्याचा पहिला सोमवार ग्रह-नक्षत्राच्या बदलात कसा जाईल? वाचा आजचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jun 03, 2024 08:45 AM IST

Today Horoscope 3 June 2024 : आज सोमवारच्या दिवशी भागवत एकादशी असून, हा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य ३ जून २०२४
राशीभविष्य ३ जून २०२४

आज सोमवार ३ जून २०२४ रोजी, वृषभ राशीत सूर्य आणि गुरूच्या संयोगामुळे गुरु आदित्य योग तयार होत आहे. तसेच, चंद्र मेष राशीत जाईल, जिथे मंगळ आधीच उपस्थित आहे. ग्रहांच्या बदलांचा प्रभाव तुमच्यासाठी कसा राहील, वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेषः 

आज आर्थिक संदर्भातील कामे मार्गी लागतील. करिअरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहील. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. 

वृषभः 

आज जुने मित्र भेटतील. तरुणांना योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वतःसाठी चोखंदळपणे खरेदी कराल. जोडीदाराचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढेल. नोकरी व्यवसायात समाधान कारक प्रगती राहील. 

मिथुनः 

आज मोठे व्यवहार लाभदायक ठरतील. मनासारखी खरेदी कराल. मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही वातावरण निर्माण होईल. वारसा हक्कातुन मिळणारी संपत्तीचे काम सुरुळित पार पडणार आहे. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. 

कर्कः 

आज तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा कराल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. 

सिंहः 

आज रखडलेली कामे पार पडतील. योग्य वेळी समयसूचकता दाखवाल. स्पर्धकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे हिताचे ठरेल. फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी मिळेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. महत्वाची कार्य आज नकी पूर्ण करा. स्पर्धा परिक्षा मुलाखती मध्ये यश मिळेल. मागील केलेल्या कामात यश मिळेल. 

कन्याः 

आज चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. 

तूळ: 

आज करिअरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह राहणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल. मनात नकारात्मक भावना वाढेल. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत. 

वृश्चिकः 

आज तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील. कलाकरांना अनेक संधी लाभतील. परदेशगमनाचे योग संभवतात. गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ होऊ शकतो. मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यशाची संधी मिळेल.

धनुः 

आज वाहने जपून चालवा. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मनाप्रमाणे कामे घडतलीच असे नाही. अनेपक्षित नुकसान देखील होऊ शकते. महत्वाची कामे टाळा. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी. कामाचा ताणतणाव राहील. फसवणूकीसारखे प्रकार घडतील. आर्थिक नुकसान होईल.

मकरः 

आज सूचक स्वप्ने पडतील. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या प्रगती होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. नविन योजनेतून लाभ होईल.

कुंभः 

आज पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. कुटुंबात आनंदी वातावरण लाभेल. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. आर्थिक दृष्या खुपच उत्तम दिवस आहे. संतती करिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात राहील.

मीनः 

आज खर्च वाढतील. मनाला ताण जाणवेल. संतती कडून अपेक्षाभंग होऊ शकतो. व्यसनांपासून सावध राहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या. छोट्याशा कारणाने मनशांती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 

WhatsApp channel