मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 29 May 2024 : विष्टी करणात आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ की अशुभ? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 29 May 2024 : विष्टी करणात आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ की अशुभ? वाचा राशीभविष्य

May 29, 2024 08:58 AM IST

Today Horoscope 29 May 2024 : आज चंद्र अहोरात्र मकर आणि कुंभ राशीत असुन श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य २९ मे २०२४
राशीभविष्य २९ मे २०२४

ग्रह नक्षत्रांची स्थिती आणि दिशा यांचा प्रभाव राशीचक्रातील बाराही राशींवर पडत असतो. या प्रभावावरुनच राशींचे भविष्य ठरवले जाते. ग्रहांची आजची स्थिती पाहता आज चंद्र अहोरात्र मकर आणि कुंभ राशीत असुन श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या चंद्रभ्रमणाचा कोणत्या राशीवर कसा परिणाम होणार हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मेषः 

आज चंद्र शुभ स्थानातून भ्रमण करत असल्याने तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही.

वृषभ: 

आज विष्ठी करणात दिवस प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारा आहे. आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादाशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन: 

आज चंद्राचे शनिच्या राशीतून होणारे भ्रमण पाहता तुम्हाला तुमच्या व्यक्तीत्वामध्ये सुधारणा करावी असे सारखे वाटत राहील. वैवाहिक आयुष्यात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे कामात कितीही व्यग्र असाल तरी, जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल.

कर्कः 

आज चंद्र संक्रमण शुभ संयोग करत आहे. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. परंतु यशाचे माप लगेच पदरात पडेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. तरुणांना प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल.

सिंहः 

आजचे चंद्रबल पाहता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशासंदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.

कन्याः 

आज ग्रहयोगात व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कर्ज हवे असणारांना त्याची तरतूद करता येईल. फक्त अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले पडेल. एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील.

तूळ: 

आज आपल्या राशीत होणाऱ्या शुभयोगामुळे जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील. प्रेमीयुगलांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. इतरांवर अवलंबून राहू नका.

वृश्चिक: 

आज अशुभ स्थानातील चंद्रभ्रमणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहिल. आर्थिक स्थिती सुधारण्या साठी थोडा काळ थांबावे लागेल. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नयेत. नोकरीनिमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील.

धनुः 

आज ऐंद्र योग पाहता कलाकारांची कला बहरेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. उपासना करणार्‍यांना भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. घरामध्ये मंगल कार्याची आखणी होईल.

मकर: 

आज अनुकूल ग्रहयुतीत तुमच्या उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील.

कुंभः 

आज ऐंद्र योगात चांगल्या सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. संतुलित विचाराचा पाठपुरावा करण्याच्या तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मीनः 

आज चंद्राचे मंगळ ग्रहाच्या नक्षत्रातून होणारे भ्रमण पाहता विचारपूर्वक निर्णय घ्या. थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल.

WhatsApp channel