Todays Horoscope 29 August 2024: आज अजा एकादशी आणि बृहस्पती पुजन दिनी चंद्र मिथुन राशीतून व आर्द्रा नक्षत्रातुन गोचर करणार आहे. सिद्धी योग आणि बव करण राहील. चंद्रमा शनिशी युतीयोग करीत आहे. तसेच वक्री बुध मार्गी होणार असुन कसा असेल आजचा दिवस ! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!
मेषः आज चंद्र शनि संयोगात भांवडांशी आपले मतभेद होऊ शकतात. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. घरातील तंग वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. करियरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर संपत्ती मालमत्ते बाबत अडचण येण्याची शक्यता आहे. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहिल. तुम्हाला वादामधुन नुकसान सहन करावे लागेल. वाद टाळणे हितावह होईल. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल.
शुभरंग: तांबूस
शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०४, ०९.
वृषभ: आज बव करणात उद्योग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उद्योजकाना मनोधैर्य सांभाळा. प्रेमीजनांना प्रेम प्रकरणात अडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. स्वभावात थोडा बेपर्वाईपणा राहील. अविचारीपणा योग्य नाही विचारा अंतीच निर्णय घ्यावेत. मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. सरकारी नोकरीत असाल वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. व्यापारात उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. हानी होऊ शकते. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्भवतील. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल.
शुभरंग: गुलाबी
शुभदिशा: पश्चिम.
शुभअंकः ०२, ०४.
मिथुनः आज सिद्धी योग लाभदायक असल्याने हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती संतोषजनक राहिल. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. शुभ कार्यात सामील व्हाल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्नाला सफलतापूर्वक यश मिळेल.
शुभरंग: पोपटी
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०३, ०६.
कर्क: आज वक्री बुध मार्गी होत असल्याने भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजना आणि नियोजनानुसार काम करा. काही करण्याची खूप स्वप्ने रंगवली असतील. त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. ध्येयापासून विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेल्या योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. भावंडाकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
शुभरंग: सफेद
शुभदिशा: वायव्य.
शुभअंकः ०२, ०७.
सिंह: आज चंद्रबल लाभल्याने नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. आपल्या कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. आर्थिक नियोजन करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रिय जनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल.
शुभरंग: लालसर
शुभदिशा: पूर्व.
शुभअंकः ०१, ०५.
कन्याः आज सिद्धी योग पाहता आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. एकप्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शीपणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. खेळाडूसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लागणार आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. मित्रमैत्रिणीच्या नातेवाईकांच्या सहकार्याने नवीन योजनेवर कार्य कराल. दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल.
शुभरंग: हिरवा
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०५, ०८.
तूळ : आज सिद्धी योगात आत्मविश्वास द्विगुणित होईल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज वितंडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. मनइच्छित फळ मिळणार आहे. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.
शुभरंग: पांढरा
शुभदिशा: आग्नेय.
शुभअंकः ०७, ०९.
वृश्चिकः आज बुध मार्गी होत असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. व्यवसायात कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. निरनिराळ्या सुचणार्या कल्पना आमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहिल. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात.
शुभरंग: केसरी
शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०३, ०९.
धनुः आज सिद्धी योगात नवीन जबाबदारी मिळेल. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. नोकरी व्यवसायाच्या वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. ज्या कार्याचा निश्चय कराल ती गोष्ट पार पडेपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. व्यापारी वर्गाकरीता महत्वाचा योग आहे. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदार बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारा कडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नवीन कल्पना आमलात आणा. संधीचं सोनं करा. विचलीत होऊ नका. शासकीय कामात यश प्राप्त होईल.
शुभरंग: पिवळसर
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०६.
मकरः आज शनि चंद्र योगात प्रकृतीवर विपरित परिणाम होऊ शकतात. कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल पण त्यापासून आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील .व्यवसायातही काहीसा ताणतणाव राहील. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात.
शुभरंग: जांभळा
शुभदिशा: नैऋत्य.
शुभअंकः ०५, ०८.
कुंभः आज अनिष्ट चंद्रभ्रमणात सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करा. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण मानसिक अस्थिरता असू शकते. कटकटी निर्माण करणारे योग आहेत. व्यवसायिकांनाही आर्थिक फसवणुकीचे योग आहेत. व्यवहार काळजीपूर्वक करा. घरासंबंधी समस्या होऊ शकते. विनाकारण वाद घालू नयेत. कलह होण्याची शक्यता राहिल. मोठी आर्थिक मोठी आर्थिक हानी फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहिल. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. काळजीपूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या.
शुभरंग: निळा
शुभदिशा: पश्चिम.
शुभअंकः ०४, ०८.
मीन : आज सिद्धी योगात विश्वासदर्शक वातावरण राहिल. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. नवीन व्यक्तीशी संबंध प्रस्थापित होतील. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती आवक झाल्याने काही समाधान लाभेल. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल.
शुभरंग: पिवळा
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०७.