Todays Horoscope 28 September 2024: आज एकादशीचा चंद्र कर्क राशीतुन आणि आश्लेषा नक्षत्रातुन भ्रमण करतोय. अहोरात्र सिद्ध योग व कौलव करण राहील. चंद्रमा राहु व नेपच्युनशी नवमपंचम योग करीत कसा असेल आजचा दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!
मेषः आज चंद्र राहु योगात भावनांची थोडीशी ओढाताण झाल्यामुळे मनाला ताण जाणवेल. संतती कडून अपेक्षाभंग होऊ शकतो. मुलांच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ ठेवावा लागेल. स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर कष्ट राखून घ्यावे लागतील. व्यसनांपासून सावध रहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या. छोट्याशा कारणाने मनशांती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवती पेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवा. आळश झटकुन कामाला लागा. शारिरिक आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढेल. मोठी शस्त्रक्रिया अपधात भय संभवते.
शुभरंग: केसरी
शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०३, ०५.
वृषभः आज कौलव करण पाहता मुलांच्या प्रगतीची चिंता वाटेल. पूर्वी केलेल्या कामाची मात्र पावती मिळेल. मानमरातब मिळेल. जुने मित्र भेटतील. आर्थिक पातळी वरील प्रश्न चुटकीसरशी सोडवाल. तरुणांना योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वतःसाठी चोखंदळपणे खरेदी कराल. काही महत्त्वाचे निर्णय अविचारपणे घेतले जाण्याची शक्यता आहे. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. साथीदाराचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढीस लागेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीना प्रगती कारक आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. नोकरी व्यवसायात समाधान कारक प्रगती राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील.
शुभरंग: सफेद
शुभदिशा: आग्नेय.
शुभअंकः ०२, ०७.
मिथुनः आज आश्लेषा नक्षत्रातुन होणार चंद्रगोचर पाहता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. त्यामध्ये चैनीच्या वस्तूंचा जास्त समावेश असेल. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. वारसा हक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. सर्वच स्तरातील नाते संबंधात स्नेह निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदारा बद्दल प्रेम भावना वाढेल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील.
शुभरंग: पोपटी
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०३, ०६.
कर्कः आज चंद्रबल लाभल्याने नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल. त्यामुळे मानमरातब आपोआप घर चालत येईल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा कराल. त्याबरोबरच उत्तम बोलण्याची साथ जर व्यवहारात दिलीत तर फायदा होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. फक्त भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कायदेशीर बाबींची प्रक्रीया असेल तर निकाल आपल्या बाजुने लागेल. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. शारिरिक कामात वाढ करण्याचा प्रयत्न करा.
शुभरंग: गुलाबी
शुभदिशा: वायव्य.
शुभअंकः ०३, ०४.
सिंहः आज चंद्र नेपच्युन संयोगात नोकरी व्यवसायात अडलेली कामे पार पडतील. योग्य वेळी समयसूचकता दाखवाल. हजरजबाबीपणामुळे वरिष्ठांची मने जिंकून घ्याल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे हिताचे ठरेल. व्यवहारात कोणाशी संगनमत करायचे हे ठरवून आपल्या फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करियरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. ऊर्जादायी आणी प्रचंड उत्साहपूर्ण दिवस असेल. महत्वाची कार्य आज नकी पूर्ण करा. स्पर्धा परिक्षा मुलाखती मध्ये यश मिळेल. मागील केलेल्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसायाची सुरवात कराल.
शुभरंग: लालसर
शुभदिशा: पूर्व.
शुभअंकः ०७, ०९.
कन्याः आज नेपच्युन चंद्र योगात आर्थिक बाबतीत पैसा मिळण्याच्या अनेक वाटा खुल्या होतील. परंतु खर्चही वाढल्यामुळे हातात पैसा मात्र रहाणार नाही. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. तुमच्यातील कलाकार लोकांना जाणवेल घरामध्ये बुद्धी आणि व्यवहार यांची सांगड योग्य तऱ्हेने घालावी लागेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. मित्रमैत्रिणीत स्नेह वाढेल. इतरावर आपला प्रभाव राहील.
शुभरंग: हिरवा
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०३, ०६.
तूळ : आज सिद्ध योगात एखादा निर्णय घेताना स्वतःच संभ्रमात पडाल. नको त्या गोष्टींवर खल करत बसाल आणि हातात मात्र काहीच पडणार नाही. करियरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. यंत्रावर काम करणारांनी अवश्य काळजी घ्यावी. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल.आपणास काहीस त्रासदायक ठरणार आहे. महत्वाच्या कामाबाबतीत जपून निर्णय घ्या. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. यामुळे ताणतणाव पूर्ण सुरुवात होईल. आळसीवृत्ती टाळावी. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्ती मध्ये नविन समस्या उद्भवतील. अचानक संकट येण्याची संभावना आहे. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत. तुम्हाला वादामधुन नुकसान सहन करावे लागेल.
शुभरंग: पांढरा
शुभदिशा: पश्चिम.
शुभअंकः ०२, ०७.
वृश्चिकः आज नेपच्युन चंद्र नवमपंचम योगात भाग्य कारक अनुभव देणारा आहे. तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. कलाकरांना अनेक संधी दार ठोठावतील. परदेशगमनाचे योग संभवतात. खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत मोजकेच काम करा पण ते बिनचूक असल्याची खात्री करा. पैशाबाबत काटेकोर रहाल आणि इतरांनीही तसे रहावे अशी तुमची इच्छा असेल. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर उत्तम योग आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. त्याचबरोबर लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल.
शुभरंग: भगवा
शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०७, ०९.
धनुः आज कौलव करणात एखादा निर्णय तडका फडकी घेण्यापासून सावधान रहा. वाहने जपून चालवा. जुनी दुखणी डोके वर काढतील. राजकारणी लोकांना जनतेचा रोष पत्करावा लागेल. कोणत्याही गोष्टीचा लाभ होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पैसे मिळाले तरी खर्चही तसेच वाढणार आहेत. मनमानी पणे काम करण्याच्या पद्धती मुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. मनाप्रमाणे कामे घडतलीच असे नाही. अनेपक्षित नुकसान देखील होऊ शकते. महत्वाची कामे करण्यास प्रतिकुल दिवस असल्याने शक्यतो टाळा. काही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी. कामाचा ताणतणाव राहील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते. फसवणूकीसारखे प्रकार घडतील.
शुभरंग: पिवळसर
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०५.
मकरः आज चंद्र बलवान असल्याने आपणास अत्यंत शुभ दिवस असणार आहे. मित्रांच्या गोतावळ्यात जास्तीत जास्त रहाण्याचा योग आहे. नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. सूचक स्वप्ने पडतील. मानमरातब अधिकाराचे योग संभवतात. अनेक गोष्टी बौद्धीक निकषावर घासून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. शिवाय स्वतःकडचा अधिकार सहजासहजी सोडणार नाही. व्यवसायिकांना योजना पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. नविन योजनेतून लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील.
शुभरंग: जांभळा
शुभदिशा: नैऋत्य.
शुभअंकः ०१, ०८.
कुंभः आज चंद्र नेपच्युन नवमपंचम योगाच्या प्रभावात काही लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. त्यासाठी मित्रमंडळींचे सहकार्य उत्तम मिळेल. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढला तरी त्यातील शॉर्टकट शोधून काम सोपे कराल. घरातील लांबलेल्या कामांकडे लक्ष द्याल. घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. आपल्या स्वभावातील दूरदर्शीपणामुळे कठीण परिस्थिती यशस्वीरित्या हाताळाल. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. आर्थिक दृष्या खुपच उत्तम दिवस आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील.नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वास्तु बाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संतती करिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज दीर्घकालीन गुंतवणूक नक्की करावी भविष्यात ही गुंतवणुक आपणास फायदेशीर ठरेल.
शुभरंग: निळा
शुभदिशा: पश्चिम
शुभअंकः ०१, ०८.
मीनः आज चंद्र नेपच्युन नवमपंचम योगात आर्थिक लाभ चांगले होतील. पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील. घरातील आंनदायक वातावरणामुळे सुखावून जाल. करियरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल. नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहिल. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपुन घ्यावा.
शुभरंग: पिवळसर
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०७, ०९.