आज मंगळावर २८ मे २०४ रोजी चंद्र केतूशी नवमपंचम योग निर्माण करत आहे. तसेच आज चंद्र मकर राशीतून आणि उत्तराषाढा व श्रवण नक्षत्रातून संक्रमण करत आहे. अशा या ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमध्ये तुम्हाला आजचा दिवस कसा जाणार हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज ब्रह्मा योगात आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे.
आज केतु चंद्र योगात प्रयत्न यशस्वी ठरतील. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराला समजून घेण्यात आघाडीवर राहिल्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल.
आज चंद्र केतुशी नवमपंचम योग करीत असुन वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांनी काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही.
आज चंद्रबल अनिष्ट असल्याने आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांनी मोठी जोखीम घेण्याचे टाळावे.
आज ब्रह्मा या शुभ योगात आपल्या व्यक्तिमत्वात वाढ होईल. अनुकुल स्थिती राहणार आहे. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. उत्तम कल्पना शक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल.
आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात दिनमान आपणास काहीसा त्रासदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहिल. जवळच्या मित्रावर अवलंबून राहाल परंतु लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील.
आज केतु चंद्र संयोगात मनाला समाधान लाभेल अश्या अनेक घटना घडतील. भावंडे मदत करतील. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक प्रगती होऊन उपासनाही चांगली होईल.
आज चंद्र केतु नवमपंचम योगात व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्यादृष्टीने लाभदायक दिवस आहे. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामाचा दर्जा सुधारेल.
आज चंद्र अनुकूल असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक आयुष्यातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल.
आज गरज करणात व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. अन्यथा तोट्याचे प्रमाण वाढेल. अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात.
आज ब्रह्मा योगात व्यापारात अती आत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरेल. घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल.
आज अनिष्ट चंद्रभ्रमणामुळे आपल्या स्वभावात चंचलता निर्माण होईल. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल.
संबंधित बातम्या