Today Horoscope 27 May 2024 : मे महिन्याचा शेवटचा सोमवार तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 27 May 2024 : मे महिन्याचा शेवटचा सोमवार तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य!

Today Horoscope 27 May 2024 : मे महिन्याचा शेवटचा सोमवार तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य!

Updated May 27, 2024 08:17 AM IST

Today Horoscope 27 May 2024 : ग्रह-नक्षत्राच्या बदलांचा १२ राशींवर कसा प्रभाव राहील? आठवड्याचा पहिला दिवस तुम्हाला किती महत्वाचा ठरेल? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य २७ मे २०२४
राशीभविष्य २७ मे २०२४

आज सोमवार २७ मे २०२४ रोजी, वृषभ राशीमध्ये शुक्र, सूर्य आणि गुरूचा संयोग तयार होत असून त्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. तसेच धनु राशीनंतर चंद्र मकर राशीत जाणार असून अनेक ग्रह-नक्षत्रांचा राशी बदल होणार आहे. अशात आठवड्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेषः 

आज आर्थिक लाभ आनंद देणारा राहील. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेसृष्टीताल लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. नशीबाची साथ लाभणार आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल.

वृषभ: 

आज विचार पूर्वक निर्णय घ्या. खर्च देखील विचारपूर्वक करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलो पार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. 

मिथुन: 

आज कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. प्रयत्नांना यश येईल. मान सन्मान मिळेल. भरभरटीचा दिवस आहे. कामे पूर्णत्वास जातील.

कर्क: 

आज वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. भाग्याची चांगली साथ मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. दुसऱ्यांना जामीन राहू नका, आर्थिक नुकसान होऊ शकते.

सिंह: 

आज आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. अडथळे निर्माण होऊ शकतात. चिंताग्रस्न मन राहील. कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. 

कन्या: 

आज कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. 

तूळ: 

आज कष्टाचे चीज होईल. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. बुद्धीमत्तेवरच वरिष्ठ खूष होतील. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. कौटुंबिक बाबतीत परिवर्तन घडणार आहे. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. 

वृश्चिक: 

आज यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

धनुः 

आज कलाकारांची कला बहरेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. 

मकरः 

आज व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध घेतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. पैशाची कामे होतील. यशाचा दिवस आहे. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. 

कुंभ: 

आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. कोणतेही निर्णय घाईगडबडीने घेऊ नयेत. नोकरीनिमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.

मीन: 

आज मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. घाई-गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. काळजी घ्या.

Whats_app_banner