आज रविवार २६ मे २०२४ रोजी चंद्र अहोरात्र धनु राशीतून आणि शुक्राच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. तसेच आज शास्त्रानुसार शुभ योग आणि बव करण योगसुद्धा तयार होत आहे. या योगांमध्ये आज रविवार सुट्टीचा दिवस तुम्हाला कसा जाणार हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.
आज चंद्राचे पाठबळ लाभल्याने कुटुंबातून तुम्हाला उत्तम सहकार्य मिळणार आहे. आरोग्याबाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे चांगले सहकार्य लाभेल. तुम्ही इतके आशावादी राहाल की, तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल.
आज मंगळ चंद्र संयोगात राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. मात्र कोणत्याही ठिकाणी टोकाची भूमिका घेणे टाळा. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहिल.
आज ग्रहमान अनुकुल आहे. बुद्धीच्या जोरावर अनेक रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. उच्च अधिकाराच्या जागेवर असणाऱ्यांना मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या बाबतीत इतरांना कामाला लावाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे.
आज शुक्राच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात प्रत्येक बाबतीत थोडा आळशीपणा कराल. परदेशासंदर्भात काही कामे असतील तर ती रखडतील. घरातील ज्येष्ठ लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. शत्रूच्या गुप्त कारस्थानाला बळी पडला नाहीत तरी त्रास मात्र होईल.
आजच्या अशुभ ग्रहयोगात कोणतीही नवीन योजना राबवताना त्या वास्तव परिस्थितीला धरून आहेत की नाही याचा विचार अवश्य करावा. घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
आज चंद्रबल अनिष्ट असल्याने अंहकारी वृत्तीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक आयुष्यात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अती भावनाप्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल.
आज शुभ चंद्रभ्रमणात घरात महागड्या वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. व्यवसायात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. मात्र मन प्रसन्न राहील.
आज मंगळ आणि चंद्र संयोग पाहता आपापल्या कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा तुम्ही उमठवणार आहात. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. तुमचे एखाद्या विषयामध्ये जितके ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही.
धनु राशीसाठी आज मंगळ-चंद्र योगात नवीन योजना यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. फक्त हातात घेतलेल्या कामामध्ये थोडे धाडस दाखवा. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील.
आज चंद्र अनिष्ट स्थानातून भ्रमण करत असल्याने थोडा अहंकार बाजूला ठेवायला हवा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक आयुष्यात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे मानसिक त्रास सहन करावे लागतील.
आज शुक्राच्या नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण पाहता घरात किंवा घराबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र आज पार पडतील. त्यामुळे आनंदी राहाल.
आज मीन राशीनुसार अनिष्ट स्थानातून चंद्र संक्रमण होत असल्याने घरापासून दूर रहाण्याचे प्रसंग येतील. खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा.
संबंधित बातम्या