मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 25 May 2024 : आज शनिवारचा दिवस 'या' राशींसाठी फायद्याचा! वाचा राशीभविष्य

Today Horoscope 25 May 2024 : आज शनिवारचा दिवस 'या' राशींसाठी फायद्याचा! वाचा राशीभविष्य

May 25, 2024 10:18 AM IST

Today Horoscope 25 May 2024 : आज शनिवारच्या दिवशी सिद्ध आणि साध्य योग जुळून येत आहे. तसेच आज राशींवर वणिज करणाचा देखील प्रभाव असणार आहे. ग्रह-नक्षत्राच्या बदलांचा १२ राशींवर कसा प्रभाव राहील? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य २५ मे २०२४
राशीभविष्य २५ मे २०२४

आज शनिवार २५ मे २०२४ रोजी सिद्ध आणि साध्य योग जुळून येत आहे. तसेच आज वणिज करणाचादेखील प्रभाव असणार आहे. चंद्र आज अहोरात्र वृश्चिक आणि धनु राशीतून बुधाच्या राशीत आणि जेष्ठा व मूळ नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये तुमचा दिवस कसा जाणार हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मेषः 

आज चंद्राचे मूळ नक्षत्रातून होणारे भ्रमण पाहता उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना मात्र जपून पाऊले टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरणार आहेत. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे.

वृषभः 

आज चंद्रबल उत्तम लाभल्याने मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे. नोकरी व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून यशस्वीपणे बाहेर पडाल. ग्रहांची साथ चांगली मिळेल. स्वतःचा मानसन्मान राखून जितकी कामे करता येतील तितकी करणार आहात.

मिथुन: 

आज अनिष्ट ग्रहमान असल्याने दिवस प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारा आहे. मानसिकता बिघडल्यामुळे काही गोष्टींना खीळ बसण्याची शक्यता आहे. बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट यश मिळेल. मुलांशी मतभेद होतील. अती भावनाप्रधानता टाळायला हवी. नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय घेणे टाळावे.

कर्क: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने साध्य योगात बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना लाभकारक दिवस आहे. प्रेमवीरांनी आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. व्यवसायात तुम्ही केलेल्या नियोजनामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. अवखळ मनाला विवेकाचे लगाम घालावे लागतील.

सिंह: 

आज चंद्र शुभस्थानातून भ्रमण करत आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. व्यवसायात भागीदाराच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा.

कन्याः 

आजचे चंद्रबल पाहता आपल्या कार्यक्षेत्रात महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक प्रगती होऊन उपासनाही चांगली होईल.

तूळ: 

आज साध्य योगात शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र नवी जोखीम घेण्याचे टाळावे. तुमच्या विक्षिप्त स्वभावाचा फायदा इतर घेणार नाहीत याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावधानता बाळगा.

वृश्चिकः 

आज शुभ चंद्र भ्रमणात आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल.

धनु: 

आज चंद्र संक्रमणाने शुभ संयोग घडून येत आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील. स्फूर्तिदायक घटना घडल्यामुळे कामामध्ये एक प्रकारची गती जाणवेल. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. मानसन्मान वाढेल.

मकर: 

आज चंद्रबल पाहता विचारपूर्वक निर्णय घ्या. उत्तम कल्पनाशक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. आरोग्याच्यादृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळावे.

कुंभ: 

आज वणिज करणात दिनमान विशेष लाभकारक आहे. प्रेमीजनांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. अस्थिर आणि चंचल स्वभावामुळे घरातील लोकांशी मात्र खटके उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल.

मीनः 

आज ज्येष्ठा नक्षत्रातील चंद्रभ्रमणात घरामध्ये प्रेमाचा ओलावा मिळण्यासाठी जरा जास्तच किंमत मोजावी लागेल. त्यामुळे अस्थिरता जाणवेल. नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील.

WhatsApp channel