Todays Horoscope 23 September 2024: आज अस्त बुध राशीपरिवर्तन करीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र वृषभ राशीतुन आणि रोहिणी नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. सिद्धी योग आणि विष्टी करण राहील. चंद्राचा शुक्राशी षडाष्टक योग होणार असुन कसा असेल सोमवार! पाहुयात आपल्या जन्मराशी नुसार! वाचा राशीभविष्य!
मेष: आज विष्टी करण असल्यामुळे आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची शक्यता आहे. कर्ज बाजारी असणारांनी हप्ते वेळेवर फेडण्याची खबरदारी घ्यावी. शांत धीमेपणाने काम करण्याच्या वृत्तीमुळे रचनात्मक कामाकडे ओढा राहील. इतरांवर जास्त विश्वास टाकत नसल्यामुळे कामाचा गाडा स्वत: ओढाल परंतु त्यामुळे थकवा जास्त जाणवेल. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. व्यापारात आपले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिनमान आहे.
शुभरंगः केसरी
शुभदिशाः दक्षिण.
शुभअंकः ०६, ०८.
वृषभ: आज रोहिणी नक्षत्रातील चंद्रभ्रमणात कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल.
शुभरंगः नारंगी
शुभदिशाः आग्नेय.
शुभअंकः ०२, ०४.
मिथुन: आज विष्टी करणात आर्थिक व्यवहार करू नयेत. थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक जोडिदार भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल.
शुभरंगः हिरवा
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०३, ०९.
कर्क: आज रोहिणी नक्षत्रातुन चंद्र गोचर होत आहे. घरामध्ये नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. याचा थोडासा ताणही येईल. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहिल. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष दया. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल.
शुभरंगः सफेद
शुभदिशाः वायव्य.
शुभअंकः ०२, ०९.
सिंह: आज चंद्रबलं उत्तम राहील. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. तुमची मते मुलांच्या गळी उतरवण्यासाठी जरा जास्तच शक्ती खर्च करावी लागेल. संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जरा जास्त राहिल्या मुळे तापटपणा वाढेल. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. दुसऱ्यावर कुरघोडी करण्या अगोदर विचार करावा लागेल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील.
शुभरंगः लालसर
शुभदिशाः पूर्व.
शुभअंकः ०१, ०५.
कन्या: आज सिद्धी योगात आर्थिक स्थिती बरी राहिल. व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. आजू बाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल.
शुभरंग: पोपटी
शुभदिशाः उत्तर.
शुभअंकः ०३, ०६.
तूळ : आज विष्टी करणात घरातील काही कारणांमुळे मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा.
शुभरंगः भगवा
शुभदिशाः आग्नेय.
शुभअंकः ०४, ०७.
वृश्चिक: आज विष्टी करण असल्याने आर्थिक बाबतीत पैसा वसूल करण्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागले तरी पैसे मिळणार आहेत. कष्टाला पर्याय नसला तरी प्रगती करणार आहात. वैवाहिक तुमच्या धोरणीपणामुळे तुमचे यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. एक वेगळेच उत्साही आणि आनंदी लाभेल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूं साठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल.
शुभरंगः केसरी
शुभदिशाः दक्षिण.
शुभअंकः ०१, ०८.
धनुः आज शुक्र चंद्र षडाष्टक योगात परदेशगमनाचे योग येतील. आर्थिक नवीन गुंतवणूक कराल. घरामध्ये अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. स्वतःच्या मताबरोबर इतरांचाही विचार करावा लागेल. वैवाहिक जीवनात कधी नव्हे ते जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. संततीच्या मनाचा आदर केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होईल. त्यामुळे मुलेही खूष राहतील. व्यापारात भागीदारा सोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहिल. मोठी आर्थिक मोठी आर्थिक हानी फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा रहिल. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. शारीरिक दृष्टीकोनातून पोटाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा.
शुभरंगः पिवळा
शुभदिशाः ईशान्य.
शुभअंकः ०२, ०४.
मकर: आज चंद्रबल लाभणार आहे. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. आर्थिक घडी बसेल. संतती साठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची कास धराल. स्वतःला प्रकाशात आणायचे असेल तर कोणा मध्यस्थाचा आधार घ्यावा लागेल. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल.
शुभरंगः जांभळा
शुभदिशाः पश्चिम.
शुभअंकः ०२, ०८.
कुंभ: आज आज ग्रहमान अनुकुल असल्याने नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस राहील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणारांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. साहित्यिक क्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल.
शुभरंगः निळा
शुभदिशाः नैऋत्य.
शुभअंकः ०६, ०८.
मीनः आज अनिष्ट स्थानातून होणारं चंद्रभ्रमण लक्षात घेता शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावध गिरी बाळगा. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष दयावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही.
शुभरंगः पिवळसर
शुभदिशाः ईशान्य.
शुभअंकः ०६, ०९.