मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 22 May 2024 : नवमपंचम योगात आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 22 May 2024 : नवमपंचम योगात आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा राशीभविष्य

May 22, 2024 08:13 AM IST

Today Horoscope 22 May 2024 : चंद्र शनिशी नवमपंचम योग करीत असून विषयोग घटीत होत आहे. सोबतच आज वरियान योग आणि गरज करणसुद्धा आहे. ग्रह-नक्षत्राच्या बदलांचा १२ राशींवर कसा प्रभाव राहील? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य २२ मे २०२४
राशीभविष्य २२ मे २०२४

आज बुधवार २२ मे २०२४ रोजी चंद्र तूळ राशीतून आणि विशाखा नक्षत्रातुन संक्रमण करणार आहे. तसेच चंद्र शनिशी नवमपंचम योग करीत असून विषयोग घटीत होत आहे. सोबतच आज वरियान योग आणि गरजकरणसुद्धा आहे. या सर्व योगांमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!.

मेषः 

मेष राशीसाठी आज चंद्रभ्रमण प्रतिकूल परिणाम देणारे आहे. लांबच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नको तेथे खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. करियरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. हातात घेतलेले कोणतेही संशोधन उत्तम कराल.

वृषभः 

वृषभ राशीच्या लोकांना आज चंद्रबल लाभल्याने कामाचा दर्जा वाढेल. इतरांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. स्वतः संवाद साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्याना आदर वाटेल. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल.

मिथुन: 

मिथुन राशीसाठी आज ग्रहमान अनुकुल असल्याने आकर्षक बोलण्यामुळे लोकांशी गोड बोलून काम करुन घ्याल. खंबीर मनाने आणि धैर्याने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर लोकांवर चांगला प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल.

कर्क: 

आज वरियान योगात कर्क राशीच्या लोकांचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात कामगारांना कितीही सवलती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मनातील काहीही हातचे राखून न ठेवता मोकळ्या निर्भिड स्वभावाबद्दल तुम्ही प्रसिद्ध व्हाल. लोकांना तुमचे कौतुक वाटेल.

सिंहः 

आज शुभ स्थानातील ग्रहयोग पाहता व्यवसायात प्रचंड काम कराल. आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे दिवसभर आनंदी उत्साही रहाल. नवीन स्थावर मालमत्ता घेण्यासाठी प्रयत्नात रहाल. नोकरीत सहकारी लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. जुने मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील.

कन्या: 

आज ग्रहयोग अनुकुल असल्याने लोकांच्या मनात तुमच्याबद्दल सुप्त दरारा निर्माण कराल. घरातील शांतता ढवळून निघेल. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. ऑफिसमधील आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. खूप दिवसांपासून अडलेली ऑर्डर हातात पडेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

तूळ: 

आज गरजकरणात खूप दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील. श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. परदेशी प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. घरामध्ये तरुण वर्गाची ये-जा राहील. तापटपणा आवरावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

वृश्चिकः 

आज चंद्राची स्थिती लक्षात घेता स्वत:ची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम रहाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल.

धनु: 

धनु राशीसाठी आज चंद्र योग अनिष्ट स्थानात होत असल्याने तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. राजकारणी लोकांना आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून राहावे.

मकर: 

आज अनुकूल चंद्र भ्रमणात स्वत:ची मते बिनधास्त मांडून आपल्या मतावर ठाम रहाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करूनआध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या योजना राबवण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी दाखवाल.

कुंभ: 

आज विषयोगात प्रतिकूल ग्रहमान असल्याने नोकरी व्यवसायात तुमच्या समोरचा माणूसही तेवढाच तुल्यबळ असल्यामुळे मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्यवेळी समज द्यावी लागेल. आत्मप्रौढ आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा.

मीन: 

मीन राशीसाठी आज चंद्रबल अनिष्ट आहे. समोरच्या माणसाच्या गूढ वागण्याचा थोडा त्रासच होणार आहे. कधी कधी समोरच्या व्यक्तीचा विचार न करता बोलणे झाल्यामुळे इतरांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते पटणार नाहीत. तेथे वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडा उद्धटपणा आणि अतिशयोक्ती बोलणे आवरायला लागेल.

WhatsApp channel