Rashi Bhavishya Today 22 August 2024 : आज संकष्ट चतुर्थीचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य-today horoscope 22 august 2024 daily rashi bhavishya in marathi astrological prediction for all zodiac signs ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Rashi Bhavishya Today 22 August 2024 : आज संकष्ट चतुर्थीचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya Today 22 August 2024 : आज संकष्ट चतुर्थीचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य

Aug 22, 2024 06:09 AM IST

Astrology prediction today 22 August : संकष्ट चतुर्थीचा असून बृहस्पती पुजनाचा योग आहे. सौर शरद ॠतु प्रांरभ होत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! जाणून घ्या आजचे सविस्तर राशीभविष्य.

आज संकष्ट चतुर्थीचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य
आज संकष्ट चतुर्थीचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 22 August 2024 : संकष्ट चतुर्थीचा असून बृहस्पती पुजनाचा योग आहे. सौर शरद ॠतु प्रांरभ होत आहे. चंद्र अहोरात्र मीन राशीतुन आणि उत्तर भाद्रपदा नक्षत्रातुन गोचर करणार आहे. धृती योग व बव करण राहील. मार्गी बुध वक्री होऊन कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कसा जाईल गुरूवारचा दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज धृती योगात असल्याने आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. घरातील मागच्या पिढीच्या लोकांशी मात्र मतभेद होण्याची शक्यता आहे. नियोजन आणि शिस्तीची फारकत होतील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक बाबतीत अडचणीतून मार्ग काढावा लागेल. छोट्याशा कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील.

शुभरंग: केसरी

शुभदिशाः दक्षिण.

शुभअंकः ०४, ०६.

वृषभः 

आज बुध राशीपरिवर्तन करीत असल्याने सकारात्मक विचारामुळे उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात तर याचे महत्त्व फारच राहील. फायदेशीर व्यवहार करता येतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावध गिरी बाळगा. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील.

शुभरंग: सफेद

शुभदिशा: आग्नेय.

शुभअंकः ०२, ०७.

मिथुनः 

आज बुध राशीबदलात व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील.

शुभरंगः हिरवा

शुभदिशाः उत्तर.

शुभअंकः ०३, ०६.

कर्कः 

आज धृती योगात व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. नवीन कार्यासाठी अनुकूल दिवस आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. तुमच्या स्वभावा तील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे.

शुभरंग: गुलाबी

शुभदिशा: पश्चिम.

शुभअंकः ०६, ०९.

सिंहः 

आज बव करणात कर्जप्रकरण काळजीपूर्वक हाताळा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार केल्यास निराश होण्याची पाळी येणार नाही. धडाडी दाखवाल परंतु अशावेळी कोणताही अविचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल. व्यवसायिकांचे उद्योगधंदयात लक्ष कमी होईल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्य पणाची भुमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका.

शुभरंगः लालसर

शुभदिशाः पूर्व.

शुभअंकः ०१, ०९.

कन्याः 

आज बृहस्पती पुजनाचा योग विशेष लाभदायक ठरणार आहे. धंद्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष रहातील. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहिल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराला कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल.

शुभरंगः पोपटी

शुभदिशाः उत्तर.

शुभअंकः ०३, ०६.

तुलाः 

आज धृती योगात उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा होईल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. जगा वेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहिल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लागणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. सामाजिक कार्यात आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

शुभरंगः सफेद

शुभदिशाः आग्नेय.

शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज चंद्रबल अनुकूल आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक झाल्यामुळे निवांत रहाल. मोठे प्रवासाचे योग येतील. व्यवसायात कामाची पद्धत आखीव आणि आधुनिक असल्यामुळे कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. वाद्यकलेशी निगडित व्यवसायांना चलती जाणवेल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंद दायक बातम्या मिळतील.

शुभरंग: भगवा

शुभदिशा: दक्षिण.

शुभअंकः ०४, ०८.

धनुः 

आज धृती योग लाभदायक असून घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या करियर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. नवीन धोरणं योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका.

शुभरंग: पिवळा

शुभदिशा: ईशान्य.

शुभअंकः ०३, ०५.

मकरः 

आज बव करणात पाहता रोजगारात अनुकूलता लाभेल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सफलतेचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला त्याचं वर्चस्व मान्य करावा लागेल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. खेळाडूंना अपेक्षित संपादन करता येईल. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

शुभरंग: निळा

शुभदिशा: पश्चिम.

शुभअंकः ०५, ०८.

कुंभः 

आज धृती योगात अपेक्षित कार्य पूर्ण करण्या साठी कसरत करावी लागेल. तुमच्या वागण्या बोलण्यात तफावत दिसल्यामुळे घरचे लोक तुम्हाला जाब विचारतील. फटकन एखादा निर्णय घेण्याचा अविचारही हातून घडू शकतो. तज्ञ व्यक्तींचे सल्ले मात्र उपयोगी पडतील. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल. व्यापार करणाऱ्यांना कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन आव्हानं स्वीकारावी लागतील. कलाकारासाठी फायदेशीर दिवस आहे.

शुभरंग: जांभळा

शुभदिशा: नैऋत्य.

शुभअंकः ०१, ०८.

मीनः 

आज बव प्रत्येक वेळी स्वत:च्या पद्धतीनेच काम करण्याच आग्रह न ठेवता दुसऱ्यांचा विचार करणे आवश्यक ठरेल. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. बुद्धी आणि शारीरिक ताकद यांचे प्रमाण बिघडल्यामुळे कामाचा वेग कमी होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसाय वृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचार पूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील.

शुभरंगः पिवळसर

शुभदिशाः ईशान्य.

शुभअंकः ०३, ०७.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

विभाग