आज मंगळवार २१ मे २०२४ रोजी, चंद्र तूळ राशीतून भ्रमण करणार आहे. त्यामुळे आज अहोरात्र स्वाती नक्षत्र आणि गजकरण राहील. चंद्रमा रवि गुरू आणि शुक्राशी षडाष्टक योग करीत असुन राजयोग आणि गजकेसरीयोग घटित होत आहे. तसेच आज व्यातिपात योगसुद्धा तयार होत आहे. या सर्व योगांमध्ये आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल हे जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांवर आज स्वाती नक्षत्रातील चंद्रभ्रमणाचा प्रभाव असणार आहे. या प्रभावात उद्योग व्यवसायात अधिकाराच्या जागेवर असणाऱ्यांना आनंद देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामात यश मिळण्याचे योग आहेत.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आज चंद्र आणि शुक्र षडाष्टक योगात नवीन योजना यशस्वी होतील. एखाद्या कार्यात थोडे धाडस दाखवावे लागेल. तुमच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल आणि त्यात यशस्वीदेखील व्हाल. तरुणांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. अचानक सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात नवे अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. कामात मनासारखे फळ मिळणार आहे.
मिथुन राशीच्यालोकांनी आज चंद्र गुरू षडाष्टक योगात अहंकार बाजूला ठेवायला हवा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक आयुष्यात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. अशावेळी मानसिक अस्थिरता जाणवेल. मुलांबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. त्यांच्या करिअरसंबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा.
आज राहुच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमण पाहता घरात किंवा घराबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. अनेक दिवसांपासून अडलेली पैशाची कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल.
सिंह राशीसाठी आज चंद्र अनिष्ट स्थानातून संक्रमण करत असताना घरापासून दूर रहाण्याचे प्रसंग येतील. मिळकतीपेक्षा खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचारविचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापासारख्या घटना घडतील.
आज कन्या राशीच्या लोकांना चंद्राचे पाठबळ लाभल्याने कामाच्या ठिकाणी उत्तम परस्पर संबंध निर्माण करण्यावर भर द्या. दुसऱ्यांचा जितका आदर कराल. तितका तुम्हाला सहकार्य चांगला मिळणार आहे. आरोग्याबाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुम्ही इतके आशावादी आहात की तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. आरोग्य थोडेसे नरमगरम राहील.
तूळ राशी आज चंद्र आणि तीन ग्रहांच्या षडाष्टक योगात असल्याने राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. फक्त कुठेही टोकाची भूमिका घेणे टाळावे. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहिल. कमी श्रमात जास्त संपत्ती मिळण्याची कला अवगत होईल. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल.
आज ग्रहांचा षडाष्टक योग पाहता करियरमध्ये तुमच्या चपळ कार्य क्षमतेमुळे तुम्ही प्रभावी ठराल. कार्यक्षेत्रात तुमचा एक वेगळाच ठसा तुम्ही उमठवणार आहात. नवीन घर किंवा जमीन खरेदीचे योग येऊ शकतात. तुमचे एखाद्या विषयामध्ये जेवढे ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल.
आज चंद्रभ्रमणात आनंदी वातावरण लाभल्याने घर सजावटीचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून तुमच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. उद्योगधंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. परंतु नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमठवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारवर्गाची व्यवसायात वाढ होईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत.
आज राहूच्या नक्षत्रातून होणाऱ्या चंद्रभ्रमणात कोणतीही नवीन योजना राबवताना अवश्य विचार करावा. घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदे गमनात अडचणी आल्यामुळे परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आज चंद्रबल अनिष्ट असल्याने अंहकारी वृत्तीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक आयुष्यात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अती भावनाप्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. हातात आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. मुलाच्याबाबतीत वाजवी पेक्षा जास्तच विचार कराल. कुटुंबातील आपापसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्यावी. कोणताही विषय जास्त ताणू नये.
आज चंद्र गुरू षडाष्टक योगात प्रत्येक बाबतीत थोडा आळशीपणा कराल. परदेशासंदर्भात काही कामे असतील तर ती रखडतील. घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. शत्रूच्या गुप्त कारस्थानाला बळी पडला नाहीत तरी त्रास मात्र होईल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल.
संबंधित बातम्या