मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 2 May 2024 : आज गुरुवार तुम्हाला कसा जाईल, स्वामी बळ पाठीशी राहील का? वाचा राशीभविष्य!

Today Horoscope 2 May 2024 : आज गुरुवार तुम्हाला कसा जाईल, स्वामी बळ पाठीशी राहील का? वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 02, 2024 09:35 AM IST

Today Horoscope 2 May 2024 : आज २ मे २०२४ गुरुवार रोजी, चैत्र कृष्ण नवमी तिथी असून, आजचा गुरुवारचा दिवस कसा जाईल? किती लाभ व संधी मिळतील? जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

राशीभविष्य २ मे २०२४
राशीभविष्य २ मे २०२४

आज गुरुवार २ मे रोजी, चैत्र कृष्ण नवमी असून, धनिष्ठा नक्षत्र आणि शुक्ल योग आहे. आज चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तैतील करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेषः 

आज आर्थिक प्रगती होईल. कामे लवकर पूर्ण होतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी मिळेल. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा. खरेदी करण्याचा मूड राहील.

वृषभ: 

आज प्रमोशन मिळण्याचे योग येतील. जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संतती कडून उत्तम सुख मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. यश मिळेल.

मिथुन: 

आज आर्थिक विवंचना थोडी सतावेल. मौल्यवान वस्तु चोरीला जाण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नुकसानदायक राहण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या. काळजीपूर्वक व्यवहार करा. वाहन जपून चालवा. 

कर्क: 

आज लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरी व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. नावलौकीक वाढेल आणि लाभ होईल.

सिंहः 

आज आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे. जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील. कलेच्या आणि संगणक क्षेत्रात असणाऱ्यांनी येणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. 

कन्याः 

आजअनावश्यक चिंता तुमचा पाठलाग करतील. प्रत्यक्षात न उतरणारी स्वप्ने रंगवल्यामुळे अपेक्षा भंग होईल. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. घर खरेदीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे.

तूळ: 

आज कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. खर्चिक आणि उधळ्या स्वभावाला आळा घालावा लागेल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचे चांगले सहकार्य मिळेल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. 

वृश्चिक: 

आज कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. धाडस आणि कामाचा उरक चांगला राहील. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदा होईल. तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे लागतील. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. 

धनु: 

आज वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद निर्माण होतील. अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. नोकरीत नवीन कल्पनांचा वापर करून कामाचे नियोजन कराल. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्या कडे लक्ष द्या. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. 

मकर: 

आज मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही तडजोडी कराव्या लागतील. आर्थिक समाधान मिळाल्यामुळे स्वस्थ राहाल. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. कोणतेही काम सांभाळून करा.

कुंभ: 

आज मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नाते वाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे.

मीन: 

आज लोकांची मने दुखावली जातील. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळणे हिताचे ठरेल. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. अविचारीपणा योग्य नाही. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. क्षणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. 

WhatsApp channel