Rashi Bhavishya Today 19 November 2024 : मालमत्ता खरेदी-विक्री करण्यासाठी आजचा दिवस खूपच चांगला; वाचा, आजचे राशिभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Rashi Bhavishya Today 19 November 2024 : मालमत्ता खरेदी-विक्री करण्यासाठी आजचा दिवस खूपच चांगला; वाचा, आजचे राशिभविष्य!

Rashi Bhavishya Today 19 November 2024 : मालमत्ता खरेदी-विक्री करण्यासाठी आजचा दिवस खूपच चांगला; वाचा, आजचे राशिभविष्य!

Nov 19, 2024 12:54 AM IST

Astrology prediction in Marathi: आज सोमवार दिनांक, १९ नोव्हेंबर अर्थात कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षाची तृतीया तिथी आहे. या तिथीला मृगशीर्षा नक्षत्र आणि सिद्ध योगाचा संयोग असेल. आज चंद्र मिथुन राशीत असणार आहे. अशा स्थितीत पाहुया, आजचे मराठी राशिभविष्य (Marathi Horoscope) काय सांगते १२ राशींची स्थिती.

मालमत्ता खरेदी-विक्री करण्यासाठी आजचा दिवस खूपच चांगला; वाचा, आजचे राशिभविष्य!
मालमत्ता खरेदी-विक्री करण्यासाठी आजचा दिवस खूपच चांगला; वाचा, आजचे राशिभविष्य!

Marathi Horoscope Today: आज १९ नोव्हेंबरला मंगळवार आहे. मंगळवारी हनुमानाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाची पूजा केल्याने सुख-समृद्धी वाढते. ज्योतिषीय गणनेनुसार १९ नोव्हेंबरचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे, तर काही राशींना जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया, १९ नोव्हेंबरला कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणाला सावध राहावे लागेल. जाणून घ्या १९ नोव्हेंबरला मेष ते मीन राशीचा दिवस कसा राहील...

मेष 

आजचा दिवस चढउतारांनी भरलेला असेल. ऑफिसमध्ये वाद विवाद होण्याची शक्यता आहे. प्रतिकूल परिस्थितीत संयम ठेवा. आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वैयक्तिक जीवनात सुख-शांती राहील. आरोग्य चांगले राहील. सुखी जीवन व्यतीत कराल.

वृषभ  

व्यावसायिक जीवनात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. टीमवर्कमुळे कामाचे चांगले परिणाम मिळतील. गुंतवणुकीची योजना विचारपूर्वक आखू शकता. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात, परंतु व्यर्थ वादविवादांपासून दूर रहा.

मिथुन  

उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. उत्पन्नात वाढ होईल. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग येतील. आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. धर्मादाय कार्यही करू शकता. मानसिक शांतता राहील. कोणतेही काम घाईगडबडीत करू नका. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.

कर्क  

बऱ्याच काळापासून रखडलेली कामे यशस्वी होतील. अविवाहित व्यक्तींचे लग्न होऊ शकते. धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग घ्याल. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. ज्यामुळे मन प्रसन्न राहील. पैशांचा व्यवहार करताना थोडी सावधगिरी बाळगा.

सिंह  

कौटुंबिक जीवनातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. पैशांचे नुकसान होऊ शकते. रोमँटिक जीवन विलक्षण असेल. प्रियकरासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. घरातील जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा.

कन्या  

ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल, पण सहकाऱ्यांसोबत मिळून केलेल्या कामाचे उत्तम परिणाम मिळतील. व्यवसायात फायदा होईल. दीर्घकाळापासूनच्या समस्या दूर होऊ लागतील. घरात चांगली बातमी मिळेल. एकल जातक एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटतील.

तूळ 

खर्चावर नियंत्रण ठेवा. घरात भावंडांशी वाद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनातील समस्यांमुळे तणाव वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने समस्या सोडवा.

वृश्चिक 

आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असेल. ऑफिसमध्ये कामाचे बिझी शेड्यूल असणार आहे. व्यवसायात फायदा होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. पैशांची बचत करण्यावर भर द्या. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल ठेवा.

धनु  

व्यावसायिक जीवनात वादविवाद टाळा. आत्मविश्वासाने नवीन कामांची जबाबदारी घ्या. करिअरच्या आव्हानांवर मात करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. तब्येतीत चढ-उतार संभवतात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबासमवेत वेळ घालवा. यामुळे ताण कमी होईल.

मकर  

सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. पैशांची आवक वाढेल. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबातील सदस्यांशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर संभाषण होऊ शकते. बऱ्याच काळानंतर जुन्या मित्रांची भेट होईल. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून मुक्ती मिळेल.

कुंभ 

आनंदी जीवन व्यतीत कराल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. घरात शुभ कार्यांचे आयोजन केल्याने आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. कौटुंबिक जबाबदारी घेण्याची तयारी ठेवा.

मीन  

कामाचा कंटाळा जाणवू शकतो. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करायची असेल तर आजचा दिवस शुभ राहील. आज तुम्हाला एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला आर्थिक मदत करावी लागू शकते, परंतु पैसे वेळेवर परत मिळतील याची खात्री करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner