Today Horoscope 18 July 2024 : आज चंद्र वृश्चिक व धनु राशीतुन ज्येष्ठा नक्षत्रातून गोचर करणार आहे. ब्रह्मा योग व बव करण राहील. चंद्रदेव रवि, बुध व शुक्राशी षडाष्टक योग करीत असुन कसा जाईल गुरूवार! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!
आज चंद्र रवि षडाष्टक योगात उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. खर्चावर नियंत्रण करावं लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावध गिरी बाळगा. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
शुभरंग: केशरी
शुभदिशा दक्षिण.
शुभअंकः ०५, ०८.
आज बव करणात शेअर गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. नेहमी पेक्षा घरच्या समस्यांकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. थोडक्या कारणावरून रागाचा पारा चढल्यामुळे घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. भावंडां बरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. नातेवाईक मित्र मंडळीबाबत दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गांनी व्यवहार जपुन करावेत. अन्यथा अडचणी वाढतील.
शुभरंग: भगवा
शुभदिशा: आग्नेय.
शुभअंकः ०१, ०८.
आज ब्रह्मा योगात मित्रमंडळींच्या सहकार्याची अपेक्षा कराल. परंतु तेथे मात्र निराशा पदरात पडेल. परंतु आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मन अस्थिर राहील तरी कामे व्यवस्थित पार पाडण्याकडे कल राहील. त्यासाठी आर्थिक नियोजन थोडे ढासळले तरी उभारी धरून ही संधी अवश्य पदरात पाडून घ्याल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल. दिवस शुभ लाभदायी असणार आहे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. विद्यार्थी वर्गासाठी नक्षत्र अनुकुल आहे. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील.
शुभरंग: पोपटी
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०३, ०७.
आज चंद्र गोचरात मनातील उत्तेजना वाढीस जाईल. घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत बॉसची मर्जी राहील. त्याचा फायदा करून घ्या. एखादी गोष्ट निर्माण करून त्याची अत्यंत कार्यक्षम सूत्रबद्ध जुळवाजुळव करण्यात धन्यता मानाल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. त्यातून काही बाबतीत क्लेश वाढेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे चिज होणार नाही. कामात निरुत्साहीपणा रहिल. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. चंगळवादा कडे कल राहील. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पत प्रतिष्ठा सांभाळा. जुनी येणी उधारी वसुलीत व्यवसायिकांना खडतरं परिस्थितीशी सामना करावा लागेल. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. जोडीदाराशी कटकटीचे वातावरण राहील.
शुभरंगः पांढरा
शुभदिशाः वायव्य.
शुभअंकः ०२, ०७.
आज चंद्र शुक्र संयोगात आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. समाजात प्रतिष्ठा मिळेल पण त्यासाठी भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. परदेशग मनाच्या संधी येतील. तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना जाचकच होणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. योग्य नियोजन आचुक निर्णय यामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल.
शुभरंगः लाल
शुभदिशाः पूर्व.
शुभअंकः ०२, ०७.
आज बुध चंद्राच्या प्रभावात कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे. रागाचा पारा चढेल. घरातील गोष्टींकडे जातीने लक्ष घालावे लागेल. लोकांच्या संपर्कात रहाण्याचे कसब वापरलेत बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहु शकते. प्रभावात अध्यात्म प्रती मन झुकेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानी पूर्वक वाटचाल करावी. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. जोडीदारासोबत सामंजस्यपूर्ण वागा. व्यापारात हानी होण्याची शक्यता आहे.
शुभरंग: हिरवा
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०३, ०६.
आज ब्रह्मा योगात काही भाग्यदायक घटनाही घडतील. तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. काहीबाबतीत गैरसमजाला तोंडही द्यावे लागेल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. ललित कला व शिल्पशास्त्रांकरीता तसेच कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. आपल्या तार्किक बुद्धीने प्रति स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य लागेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील.
शुभरंगः पांढरा
शुभदिशाः वायव्य.
शुभअंकः ०१, ०५.
आज मंगळ चंद्र संयोगात कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. मुलांसाठी वाट्टेल ते करणारी तुमची मनोवृत्ती असली तरी त्यांच्या अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. आज नवनवीन प्रोजेक्टसाठी अनुकूल दिनमान राहील.
शुभरंगः केशरी
शुभदिशाः दक्षिण.
शुभअंकः ०२, ०६.
आज चंद्रबल उत्तम असल्याने अत्यंत शुभ दिनमान असेल. नोकरी व्यवसायात नवीन क्षितीजे साद घालतील. परंतु त्याचा खोलवर अभ्यास करणे हिताचे ठरेल. दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जादा काम करावे लागेल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्टया मुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील. आपल्या वाणीचा इतरावर प्रभाव राहील.
शुभरंगः पिवळा
शुभदिशाः ईशान्य.
शुभअंकः ०३, ०६.
आज बव करणात मनामध्ये मात्र प्रचंड खळबळ असा अनुभव येईल. जवळच्या मित्राच्या भरवशावर रहाल परंतु त्यापासून लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. काहींना परदेशात प्रवास घडुन येतील. स्वभावानुसार मानसिक चिडचिड दगदग होईल. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. वाईट संगत अंगलट येईल.मानसिक क्लेशातून त्रासातुन जावे लागणार आहे. अनैतिक कामापासुन दुर रहा अन्यथा कायद्याच्या कचाट्यात अडकाल.
शुभरंगः जांभळा
शुभदिशाः पश्चिम.
शुभअंकः ०१, ०५.
आज चंद्र शुक्र संयोगात आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल आत्मविश्वास उंचावलेला असेल. कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. अन्यथा स्वताचे नुकसान करून घ्याल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल.
शुभरंगः निळा
शुभदिशाः नैऋत्य.
शुभअंकः ०६, ०८.
आज चंद्र गुरू संयोगात धडाडीने एखादे काम पूर्ण करणे या गोष्टी संभवतात. शैक्षणिक क्षेत्रात संशोधनही चांगल्या प्रकारे करू शकता. अभ्यासात प्रगती करून घेता येईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नविन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. घाईगडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील.
शुभरंगः पिवळा
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०६, ०९.