Todays Horoscope 17 September 2024: आज प्रौष्ठपदी पौर्णिमा व अंनत चतुर्दशी आहे. चंद्र कुंभ राशीतुन आणि शततारका नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. धृती, शुल योग आणि विष्टी करण आहे. ग्रहयोग पाहता चंद्रमा बुधाशी प्रतियोग करत असुन कसा असेल मंगळवार! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!
मेषः आज शुल योग असल्याने दिनमान प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारं राहील. मानसिकता बिघडल्यामुळे काही गोष्टींत अडथळे निर्माण होऊ शकतात. बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट फळे मिळतील. मुलांशी मतभेद होतील. अती भावनाप्रधानता टाळायला हवी. नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय घेणे टाळावे. धंद्यात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक न केलेली बरी राहील. मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची संभवना आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल.
शुभरंग: नारंगी
शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०१, ०८.
वृषभः आज बुध चंद्र शुभयोगामुळे आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. जुनी येणी वसूल होतील. एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. कोणतीही टोकाची भूमिका घेण्याअगोदर सुवर्णमध्य काढावा लागेल. नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारा साठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.व्यापारात लाभ होईल. संपादन क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील.
शुभरंग: नारंगी
शुभदिशा: आग्नेय.
शुभअंकः ०२, ०७.
मिथुनः आज शुल योगात कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. छोटी मोठी सवलत मिळण्यासाठी वरिष्ठांना खूष ठेवावे लागेल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.
शुभरंग: पोपटी
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०३, ०७.
कर्क: आज धृती योग पाहता घरामध्ये प्रेमाचा ओलावा मिळण्यासाठी जरा जास्तच किंमत मोजावी लागेल. त्यामुळे अस्थिरता जाणवेल. नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. मुलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पहावे लागतील. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. योजनेतून लाभ होतील. व्यापार नविन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्य लागेल. संततीची विद्याभ्यासात रुची वाढेल. दिवस शुभ आहे.
शुभरंग: पांढरा
शुभदिशा: वायव्य.
शुभअंकः ०७, ०८.
सिंह: आज शुल योगात विचार पूर्वक निर्णय घ्या. उत्तम कल्पनाशक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळावे. दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर रहाल. तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची दाद चांगली मिळेल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलो पार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष दयावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहिल. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल.
शुभरंग: लालसर
शुभदिशा: पूर्व.
शुभअंकः ०५, ०८.
कन्या: आज चंद्र बुध संयोगात दिनमान विशेष कृपा कारक आहे. प्रेमीजनांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. अस्थिर आणि चंचल स्वभावामुळे घरातील लोकांशी मात्र खटके उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल. परंतु तेथील वातावरण मात्र उल्हासित करणारे असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
शुभरंग: हिरवा
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०३, ०६.
तूळ : आज चंद्रगोचर बुधाशी शुभ संयोग करत आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील. स्फूर्तिदायक घटना घडल्यामुळे कामामध्ये एक प्रकारची गती जाणवेल. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. तरुण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल.
शुभरंग: सफेद
शुभदिशा: वायव्य.
शुभअंकः ०२, ०७.
वृश्चिकः आज बुध चंद्र प्रतियोगात योगात शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र जोखीम घेण्याचे टाळावे. तुमच्या विक्षिप्त स्वभावाचा फायदा इतर घेणार नाहीत याची काळजी घ्यावी. अविचाराने कर्ज काढू नका. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल.चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.
शुभरंग: तांबूस
शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०१, ०९.
धनु: आज चंद्रबल उत्तम असल्याने आपल्याला यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. भाग्योदयकारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल. परमेश्वरवर विश्वास दृढ होईल. मानसिक स्वास्थ लाभेल.
शुभरंग: पिवळसर
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०७.
मकर: आज चंद्र बुध योगात बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे. प्रेमवीरांनी आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. व्यवसायात तुम्ही केलेल्या नियोजनामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. अवखळ मनाला विवेकाचे लगाम घालावे लागतील. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. दुसर्याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल.
शुभरंग: जांभळा
शुभदिशा: नैऋत्य.
शुभअंकः ०७, ०८.
कुंभ: आज चंद्रबल पाहता व्यवसायात पार्टनरच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल. जीवनाकडे पहाऱ्याचा दृष्टीकोन खेळकर हवा. प्रवासयोग परदेशी जाण्या संबंधात काही कामे अडली असतील तर ती पार पडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. रोजगारात चांगल्या परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल.
शुभरंग: निळा
शुभदिशा: पश्चिम.
शुभअंकः ०२, ०८.
मीनः आज चंद्रबल उत्तम लाभल्याने मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. ग्रहांची साथ चांगली मिळेल. स्वतःचा मान राखून जेवढी कामे उरकता येतील तेवढी उरकणार आहात. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आरोग्य उत्तम राहणार आहे.
शुभरंग: पिवळा
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०४, ०६.