Rashi Bhavishya Today 16 October 2024: आज कौजागिरी पौर्णिमा, कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार शुभ? वाचा
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Rashi Bhavishya Today 16 October 2024: आज कौजागिरी पौर्णिमा, कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार शुभ? वाचा

Rashi Bhavishya Today 16 October 2024: आज कौजागिरी पौर्णिमा, कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार शुभ? वाचा

Oct 16, 2024 05:54 AM IST

Today Horoscope 16 October 2024: आज कौजागिरी पौर्णिमा आकाश दिपमान चंद्र मीन राशीतुन आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. ध्रुव व व्याघात योग गरज वणिज करण राहील. चंद्र रवि केतुशी प्रतियोग करीत आहे. दिनमानावर शनिचा प्रभाव राहील.

कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार शुभ? वाचा
कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार शुभ? वाचा

मेषः आज रवि चंद्र प्रतियोगात आर्थिक लाभ होतील. आपल्या वाणीचा प्रभाव इतरावर पडेल. मनस्वास्थ उत्तम राहिल. आनंददायक घटना घडतील. शत्रूला पूर्णपणे कोंडीत प्रहार करण्यावर तुमचा भर राहील. तुमची कामे सहजगत्या होणार आहेत. नशिबाची साथ चांगली मिळेल. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे.

शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.

शुभअंकः ०२, ०८.

वृषभ: आज चंद्र रवि प्रतियोगात आपणास दिनमान उत्तम राहील. आपला आत्मविशास वाढीस लागेल. आत्म विश्वास उत्तम असल्यामुळे कोणत्याही समस्येला पाठीवर घेण्याची ताकद तुमच्याकडे राहील. तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रुपांतर प्रेमात होऊ शकेल. काही आडाखे निश्चित बांधाल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईका कडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहिल. स्वभावा तील गुणदोषं मात्र टाळावेत. शासकिय योजनेतून लाभ होईल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. नवीन घर वाहन खरेदीस चांगला दिवस आहे.

शुभरंग: गुलाबी शुभदिशा: आग्नेय.

शुभअंकः ०६, ०९.

मिथुनः आज व्याघात योगात वृद्धी होईल. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्या मुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस शुभ राहिल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील.

शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर.

शुभअंकः ०३, ०९.

कर्क: आज ध्रुव योगात आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्त भेटल्यामुळे आनंदी रहाल. तरुणांच्या अती आधुनिक वागण्यामुळे त्यांचे मोठ्या लोकांशी पटणार नाही. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जिवन आनंदी राहिल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. कोर्टकचेरीची प्रकरण असतील तर निकाल आपल्या बाजूने लागेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल. आजचे दिनमान सफलता दायक आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींच्या मानधनात वाढ होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.

शुभरंग: पांढरा शुभदिशा: वायव्य.

शुभअंकः ०४, ०७.

सिंह: आज चंद्र केतु प्रतियोगात अशुभ फल प्राप्त होतील. नोकरीत थोडा दूरदर्शीपणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कधीकधी एखादा निर्णय घेण्याबाबत तुमच्याकडून अविचारही होऊ शकतो. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. मनस्वास्थ सांभाळा. मन स्थिर ठेवा. प्रतिष्ठा धुळीला मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या व मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालूनका. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.

शुभरंग: लालसर शुभदिशा: पूर्व.

शुभअंकः ०५, ०८.

कन्याः आज चंद्रबल उत्तम असल्याने दिवस उन्नती कारक आहे. मनात उर्जा आणि सकारात्मना वाढेल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणारांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. वाहन घर खरेदी साठी शुभ दिवस आहे. आर्थिक सहकार्य लागेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आनंद दायक राहिल. व्यापारी वर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोना तून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल.

शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.

शुभअंकः ०३, ०९.

तुला: आज चंद्र रवि प्रतियोगात योगात व्यापारात आर्थिक वाढ होईल. कामानिमित्त परदेश गमनाच्या संधी मिळतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. व्यापारात तुमच्या हुशार व्यक्तिमत्वाचे दर्शन घडेल. घरात जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. विवाह बद्दल इच्छित असणाऱ्याचे विवाह खात्रीशीर जुळतील. संततीकडून समाधान सुख लाभेल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.

शुभरंग: नारंगी शुभदिशा: पश्चिम.

शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक: आज चंद्रबल अनिष्ट असल्याने कलह उत्पन्न होणारा योग आहे. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. संताप आणि चिडचिड निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण करावं लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत रागावर नियंत्रण ठेवा. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्या. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल.

शुभरंगः केसरी शुभदिशाः दक्षिण.

शुभअंकः ०१, ०९.

धनु: आज चंद्रबल लाभल्याने बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्या करिता आनंदी दिवस आहे. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी रहिल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य उत्तम राहिल.

शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.

शुभअंकः ०४, ०७.

मकर: आज अनिष्ट चंद्र भ्रमणात मनातील संयशावृती वाढेल. कडक बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. तुमचा मुड कधी जाईल. आणि कधी चिडाल याचा भरवसा राहणार नाही. मुलांच्या भन्नाट कल्पनांमुळे चक्रावून जाल भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करा.

शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.

शुभअंकः ०५, ०८.

कुंभ: आज ध्रुव योगात आपणास आर्थिक लाभ होईल. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. घरात उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. बौद्धीक गोष्टींकडे ओढा राहील. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे.प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल.

शुभरंग: जांभळा शुभदिशाः पश्चिम.

शुभअंकः ०७, ०८.

मीन: आज चंद्र केतु प्रतियोगात अनपेक्षित फळे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील नातेवाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्याल. धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठ मंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या.

शुभरंग: पिवळा शुभदिशाः ईशान्य.

शुभअंकः ०३, ०६.

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

Whats_app_banner