Today Horoscope 16 May 2024 : नवपंचम योगात मेष ते मीन कोणती राशी राहणार फायद्यात? वाचा आजचे राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 16 May 2024 : नवपंचम योगात मेष ते मीन कोणती राशी राहणार फायद्यात? वाचा आजचे राशीभविष्य

Today Horoscope 16 May 2024 : नवपंचम योगात मेष ते मीन कोणती राशी राहणार फायद्यात? वाचा आजचे राशीभविष्य

Published May 16, 2024 09:05 AM IST

Today Horoscope 16 May 2024 : आज १६ मे २०२४ गुरुवार रोजी, आज चंद्र सिंह राशीतून संक्रमण करणार आहे. त्यामुळे बुध आणि हर्शलशी नवमपंचम योग तयार होत आहे. ग्रह-नक्षत्राच्या बदलांचा १२ राशींवर कसा प्रभाव राहील? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य १६ मे २०२४
राशीभविष्य १६ मे २०२४ (Freepik)

शास्त्रानुसार ग्रहांचे संक्रमण राशीचक्रातील राशींवर परिणाम करत असते.आज चंद्र सिंह राशीतून संक्रमण करणार आहे. त्यामुळे बुध आणि हर्शलशी नवमपंचम योग तयार होत आहे. तसेच आज मघा नक्षत्र आणि बालव करण आहे. तसेच आज असलेल्या व्याघात योगात आजचा दिवस कसा असेल याबाबतचे राशीभविष्य जाणून घेऊया.

मेषः 

मेष राशीसाठी आजचे चंद्रभ्रमण पाहता कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावा लागेल. अशावेळी मानसिक अस्थिरता जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. त्यांच्या करिअरसंबंधी चिंता वाटेल. मीपणा करण्याची प्रवृती मात्र टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत.

वृषभ: 

आज चंद्राचे पाठबळ लाभल्याने कामाच्या ठिकाणी उत्तम परस्परसंबंध निर्माण करण्यावर भर द्याल. इतरांचा जितका आदर कराल तितकाच तुम्हाला सहकार्य चांगला मिळणार आहे. आरोग्याबाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत.मदतनीस लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुम्ही इतके आशावादी राहाल की, तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. प्रकृती थोडी नरमगरम जाणवेल.

मिथुनः 

आज चंद्र-बुध नवमपंचम योग पाहता राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. फक्त कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेऊ नका. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहिल. कमी श्रमात जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल.

कर्क: 

आज ग्रहमान अनुकुल आहे. बुद्धीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लागतील. अधिकाऱ्याच्या जागेवर असणाऱ्यांना मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या बाबतीत इतरांना कामाला लावाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्यादृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका.

सिंह: 

आज मघा नक्षत्रातील चंद्रभ्रमणात प्रत्येक बाबतीत थोडा आळशीपणा कराल. परदेशसंदर्भात काही कामे असतील तर ती रखडतील. घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. शत्रूच्या गुप्त कारस्थानाला बळी पडला नाहीत तरी त्रास मात्र होईल. स्वतःच्या हिंमतीवर कामे पूर्ण कराल. प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल.

कन्या: 

आजच्या अशुभ चंद्रभ्रमणात कोणतीही नवीन योजना राबवताना त्या वास्तव परिस्थितीला धरून आहेत की नाही याचा विचार अवश्य करावा. घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशगमनात अडचणी आल्यामुळे परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे.

तूळ:

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने अंहकारी वृत्तीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक आयुष्यात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अती भावनिकतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. हातात आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. मुलाच्या बाबतीत वाजवीपेक्षा जास्तच विचार कराल. कुटुंबातील आपसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नका.

वृश्चिक: 

आज चंद्रभ्रमणात घराची सजावट करण्याचे स्वप्न साकार होईल. घरात महागड्या वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून तुमच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. व्यापारात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मानसन्मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. परंतु नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गाची व्यवसायात वाढ होईल.

धनु: 

आज मघा नक्षत्रातील चंद्रभ्रमण पाहता घरात किंवा घराबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल. स्वत:च्या ताकतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची रखडलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप फायदा होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी आज शुभ योग निर्माण होत आहेत.

मकरः 

आज चंद्र हर्षल नवमपंचम योगात नवीन योजना यशस्वी होतील. एखाद्या कामात थोडे धाडस दाखवावे लागेल. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. कोणत्याही कामात मनप्रमाणे फळ मिळणार आहे.

कुंभ: 

आज चंद्र अनिष्ट स्थानातून संक्रमण करत असल्याने तुमच्या खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापासारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल.

मीन: 

आज ग्रहांचा नवमपंचम योग पाहता करियरमध्ये तुमच्या कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा तुम्ही उमठवणार आहात. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. नवीन घर स्थावर मालमत्ता खरेदीचे योग येऊ शकतात. तुमचे एखाद्या विषयामध्ये जेवढे ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील.

Whats_app_banner