Todays Horoscope 15 october 2024 : आज भौमप्रदोष दिनी चंद्र कुंभ व मीन राशीतुन तर पुर्वा भाद्रपदा नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. वृद्धी योग व कौलव करण राहील. चंद्रमा शनि, राहु व नेपच्युनशी संयोग करीत असुन विषयोग व ग्रहणयोग घटीत होत आहे. कसा जाईल मंगळवार! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!
मेषः आज चंद्र नेपच्युन संयोगात आपला आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. निश्चितच कामकाज किंवा रोजगारात संतोष जनक परिणामाची आशा करू शकता. जुन्या मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
शुभरंग: केसरी
शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०४, ०७.
वृषभः आज वृद्धी योगात हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि मुडी स्वभावामुळे तुम्ही जरा जगावेगळे वाटता. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल रहाणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे.
शुभरंगः भगवा
शुभदिशाः आग्नेय.
शुभअंकः ०३, ०६.
मिथुन: आज विषयोग पाहता व्यवसायात कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. इतरांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले तरी बाकी कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रयत्नाला महत्त्व द्यावे लागेल. मुलांच्या आवाक्याबाहेरच्या मागण्यांमुळे वैतागुन जाल. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल.
शुभरंगः पोपटी
शुभदिशाः उत्तर.
शुभअंकः ०२, ०६.
कर्क: आज चंद्राचं बल लाभल्याने आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण मानसिक अस्थिरता असू शकते. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे.
शुभरंगः पांढरा
शुभदिशाः वायव्य.
शुभअंकः ०२, ०७.
सिंहः आज वृद्धी योगात व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. नवीन संधीचे दान तुमच्या पदरात टाकण्यासाठी येत आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. ज्या कार्याचा निश्चय कराल ती गोष्ट पार पडेपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.
शुभरंगः लालसर
शुभदिशाः पूर्व.
शुभअंकः ०५, ०९.
कन्याः आज शनि चंद्राशी होणारा संयोग पाहता धार्मिक गोष्टी करण्यासाठी बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न सफलदायक ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. हितशत्रु आणि विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल. व्यापार रोजगारात अनुकूल असा प्रतिसाद मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल.
शुभरंग: हिरवा
शुभदिशा: उत्तर.
शुभअंकः ०२, ०७.
तूळ : आजच्या चंद्र राहु योग पाहता आपल्या कार्यक्षेत्रात कामे उरकण्यात थोडी दिरंगाई होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. घरातील तंग वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. मुलांच्या मताशी सहमत न झाल्या मुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन मनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
शुभरंग: गुलाबी
शुभदिशा: आग्नेय.
शुभअंकः ०२, ०७.
वृश्चिकः आज वृद्धी योगात एक प्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शी पणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज, वितंडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल.
शुभरंग: नारंगी
शुभदिशा: दक्षिण.
शुभअंकः ०१, ०९.
धनुः आज ग्रहणयोगात मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कलाकारांना कला क्षेत्रातवाव मिळेल पण त्यापासून आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. दिनमान कामाच्या दृष्टीकोनातून कष्टदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
शुभरंग: पिवळसर
शुभदिशा: ईशान्य.
शुभअंकः ०३, ०६.
मकरः आज चंद्राशी होणारा शनिचा योग पाहता करण्याची खूप स्वप्ने रंगवली असतील. तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा बेपर्वाईपणा राहील. प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल. आपल्या स्वभावात चंचलता निर्माण होईल.
शुभरंगः निळा
शुभदिशाः नैऋत्य.
शुभअंकः ०४, ०८.
कुंभः आज वृद्धी योगात नोकरी व्यवसायात मनासारखे कार्यामुळे तब्येत खूष राहील. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील.
शुभरंग: जांभळा
शुभदिशा: पश्चिम.
शुभअंकः ०६, ०८.
मीनः आज शनि चंद्र योगात राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमीजनांना प्रेमप्रकरणातअडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वाढविवाद मात्र टाळावेत.
शुभरंगः पिवळा
शुभदिशाः ईशान्य.
शुभअंकः ०६, ०९.