आज बुधवार १५ मे २०२४ रोजी बुधाष्टमीचा दिवस आहे. आज चंद्र अहोरात्र कर्क आणि सिंह या गुरूच्या राशीतून भ्रमण करत आहे. आज केतु नक्षत्र असुन वृद्धी आणि ध्रुव योगसुद्धा आहे. शनि चंद्र प्रतीयोगात राशींवरसुद्धा याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. पाहूया आजचे राशीभविष्य नेमके काय सांगते
आज मेष राशीसाठी दिवस उत्तम आहे. आज चंद्र शनिशी संयोग करीत आहे. आपल्या कुवतीनुसार कोणतेही काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. तसेच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. सामाजिक उत्सवात सहभागी व्हाल. त्यामुळे समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात येण्याची संधी मिळेल. तुमच्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. अपेक्षीत व्यवहार योग्यरित्या पार पाडणारे ग्रहमान आहे.
वृषभ राशीसाठी आज संमिश्र वातावरण असणार आहे. आजचे चंद्रभ्रमण पाहता कलह उत्पन्न होणारा योग आहे. कोणत्याही देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे नीट वाचा. विनाकारण वाद घालू नका. एखाद्या मोठ्या निर्णयात कुटुंबाचा पाठिंबा मिळणार नाही. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून हुञ्जत घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण धैर्याचे ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल.
आज वृद्धी योगात घरात मंगल धार्मिक कार्य घडतील. व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार कराल. जास्तीच्या भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस, प्रकाशक, साहित्यिक यांच्याकरिता आनंदी दिवस आहे.
आज शनिशी होणारा योग पाहता आपणास शुभ-अशुभ अशी संमिश्र स्वरुपाची फळे मिळतील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. कमाईमध्येही वाढ होण्याचे योग बनतील. तुमची स्थिती उत्तम होईल. तुम्हाला तुमच्या कार्यात धैर्याच्या प्रति सजग राहण्याची आवश्यकता आहे. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. अनिष्ट चंद्रभ्रमणात मनातील संयशवृती वाढेल.
आज शनि चंद्र योगात आपणास आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. घरातील ज्येष्ठांचे निर्णय लाभदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल.
आज चंद्रबल उत्तम असल्याने अंत्यत शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांच्या व्यवसायिक आणि कौटुंबिक आयुष्यात समृद्धी येईल. मेहनत आणि कुठल्याही कार्याच्या प्रति तुमचा कल पाहून तुमच्या उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात तुम्हाला ओळखले जाईल. मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहेत.
आज ध्रुव योगात आपणास दिनमान उत्तम राहील. वडीलांपासून अथवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीपासून आर्थिक लाभ होतील. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल रुचेल असेच वक्तव्य करा. विलासी वस्तूंची खरेदी कराल. तुमचा आत्मविशास वाढीस लागेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. तुमच्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल.
आज चंद्रबल मिळाल्याने नवीन कामकाज सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकी साठी दिवस उत्तम राहील.
आज ध्रुव योगात अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता आहे. चंद्रभ्रमण हे अशुभ स्थानातून होत आहे. व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा. कामात अडचणी येऊ शकतात. कार्यांची गती मंदावेल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल.
आज चंद्र केतुच्या नक्षत्रातून भ्रमण करतोय. संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. करिअरची गती काहीशी कमी होतांना दिसेल. नोकरीत नेहमीपेक्षा अधिक काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातून मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे.
आज चंद्र शनिशी संयोग करीत आहे. व्यापारात अधिक कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. तरुणांचे विवाह जुळतील. भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावंडाची योग्य साथ मिळेल. तुमच्यासमोर नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येईल. युवकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी तुम्हाला मिळणार आहे.
मीन राशीसाठी आज चंद्रबल अनिष्ट अशुभ परिणाम देईल. योगा आणि व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला लगाम घाला. वैचारिक मतभेदामुळे कौटुंबिक नात्यामध्ये दूरी येण्याचे योग आहेत. पालकांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चंचलतेवर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.