Today Horoscope 14 May 2024 : आजचा मंगळवार तुमच्यासाठी किती लाभप्रद ठरेल? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 14 May 2024 : आजचा मंगळवार तुमच्यासाठी किती लाभप्रद ठरेल? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात

Today Horoscope 14 May 2024 : आजचा मंगळवार तुमच्यासाठी किती लाभप्रद ठरेल? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात

May 14, 2024 08:24 AM IST

Today Horoscope 14 May 2024 : आज १४ मे २०२४ मंगळवार रोजी, गंगा सप्तमी अर्थात गंगा पूजन दिवशी अहोरात्र चंद्र कर्क राशीतून भ्रमण करणार आहे. ग्रह-नक्षत्राच्या या बदलामुळे १२ राशींवर कसा प्रभाव राहील? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य १४ मे २०२४
राशीभविष्य १४ मे २०२४

आज मंगळवार १४ मे २०२४ रोजी, चंद्राचे कर्क राशीत आणि पुष्यनंतर आश्लेषा नक्षत्रातून भ्रमण होईल. अशा स्थितीत चंद्र आणि गुरु एकमेकांच्या केंद्रस्थानी राहून गजकेसरी योग तयार करत आहेत. चंद्राच्या या संक्रमणासोबतच सूर्य देखील आज मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, अशात गुरू आदित्य योगही निर्माण होत आहे. या शुभ प्रभावाचा मेष ते मीन सर्व राशींवर परिणाम होईल, वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष

मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. अचानक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक आयुष्यातील वाद मतभेद दूर होतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. कामानिमित्त परदेशगमनाचे योग जुळून येतील. व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे.

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. दिवस काहीसा त्रासदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहील. एखाद्या कामात जवळच्या मित्रावर अवलंबून रहाल परंतु लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. व्यापार व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना जाचकच होणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता. आहे. आर्थिक गुंतवणूक कराल.

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. मनाला समाधान लाभेल अश्या अनेक घटना घडतील. महत्वाच्या कार्यात भावंडे मदत करतील. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक स्वारस्य वाढून उपासनाही चांगली होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापारात आर्थिक वाढ करणारा दिवस राहिल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल.

कर्क

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. परदेशागमन खूप फायदेशीर ठरणार आहे. आर्थिकबाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे. त्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अथवा एखादे दुखणे पाठ धरु शकते.

सिंह

सिंह राशीसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असणार आहे. स्वभावात चंचलता निर्माण होईल. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वभावातील तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. व्यवसायात भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड जाईल. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. कामानिमित्त दूरच्या प्रवासाचे योग येतील.

कन्या

आज व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामाचा दर्जा सुधारेल. समाजकारणाची आवड असल्यामुळे जन मानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम रहाणार आहात. कामाचीगती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो.

तूळ

तूळ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेणे टाळा. व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेली गुंतवणूक व्यवसायाच्यादृष्टीने फायदेशीर ठरेल. घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल. भावंडांशी वाद संभवतात. कागदोपत्री करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या. तसेच कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिकदृष्टीकोनातून आज तणाव जाणवेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी लागेल. उत्तम कल्पना शक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची चांगली दाद मिळेल. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कोणतेही महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

धनु

धनु राशीच्या व्यक्तिंनी आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करावे. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्यांनी मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. हप्ते फेडताना त्रास होईल. व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून धैर्याने बाहेर पडाल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. नातेसंबंध टिकवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील.

मकर

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. प्रयत्न यशस्वी ठरतील. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराला समजून घेण्यात आघाडीवर राहिल्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. कोणावर विसंबून राहिलात तर मात्र मोठा नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कुंभ

आज नवीन वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांनी काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायात इतरांबरोबर सौजन्य दाखवल्यामुळे तसेच सहकार्यही तुम्हाला मिळेल. जुनी येणी वसूल होतील.

मीन

मीन राशीसाठी आजचा दिवस काहीसा संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. व्यापारात व्यवहाराची सांगड योग्य रितीने घातली नाही तर तोट्याचे प्रमाण वाढेल. अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. उतावीळपणा बाजूला ठेऊन पोक्त विचार करून कामाची आखणी करा. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही.

Whats_app_banner