Today Horoscope 13 May 2024 : आजचा मतदानाचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? वाचा आजचे थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 13 May 2024 : आजचा मतदानाचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? वाचा आजचे थोडक्यात राशीभविष्य

Today Horoscope 13 May 2024 : आजचा मतदानाचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? वाचा आजचे थोडक्यात राशीभविष्य

May 13, 2024 09:48 AM IST

Today Horoscope 13 May 2024 : आज १३ मे २०२४ सोमवार रोजी, चंद्र अहोरात्र कर्क राशीतुन भ्रमण करणार असून, केंद्र योगासोबत सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. ग्रह-नक्षत्राच्या या बदलामुळे १२ राशींवर कसा प्रभाव राहील? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य १३ मे २०२४
राशीभविष्य १३ मे २०२४

आज सोमवार १३ मे २०२४ रोजी, षष्ठीचा चंद्र कर्क राशीतून भ्रमण करणार आहे. पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्राचा आजच्या दिनमानावर प्रभाव राहील. तसेच, शनिची चंद्रावर पुर्ण दृष्टी असेल. गंड योग आणि कौलव करणात राशीचक्रातील राशींवर कसा प्रभाव असणार आहे, वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेषः 

आज हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. गुप्तशत्रुपासुन पिडा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. ताणतणाव वाढेल. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. 

वृषभः 

आज द्विधा मन:स्थितीमुळे तुमचा घोटाळा होऊ शकतो. एकंदरीत तब्येत नाजूक राहण्याकडे कल राहील. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. शारिरिक व्याधी उद्‌भवतील. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. 

मिथुनः 

आज व्यवसायात कोणतेही काम पूर्ण करायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. यामुळे रेंगाळलेली कामे गती घेतील. विद्यार्थ्याच्या अभ्यासात प्रगती होईल. व्यापारात प्रगतीकारक दिवस असुन अचानक आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरेल. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग रहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील.

कर्कः 

आज प्रगती होईल. परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिलावर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. मानसिक सौख्य लाभेल. आपला छंद जोपासाल. नवनवीन कल्पना सुचतील. 

सिंहः 

आज धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. नवीन मालमत्तेसंबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. भावडांशी वादविवाद टाळा. नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल. पैशाची आवक चांगली राहील.

कन्या: 

आज नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. कर्ज घेणे देणे टाळावे. शारिरिक व्याधी कडे दुर्लक्ष करू नये. आहारावर नियंत्रण ठेवा. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. मोठे व्यवहार टाळावेत. शक्यतो प्रवास टाळा. वाहने सावकाश चालवा. अपघात भय संभवते. 

तूळ: 

आज व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. 

वृश्चिकः 

आज रोजगारात नवीन कामाची आखणी कराल. आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. 

धनुः 

आज आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. प्रत्येक काम फत्ते करणार आहात. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. सामाजिक क्षेत्रात काम कराल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. उद्योग व्यापार तेजीत राहील. भाऊबहिणीसी सलोख्याचे संबंध राहतील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील. प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल.

मकरः 

आज स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. कुटुंबातुन विशेष सहकार्य लाभेल. ग्रंथ लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहिल. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील.

कुंभः 

आज अचानक उद्भभवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. नोकरीत बदल करायची इच्छा असणाऱ्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल राहील. व्यापारात आर्थिक प्रगती होईल. यश निश्चित लाभेल.

मीनः 

आज अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. मान-सन्मान प्रतिष्ठा वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. 

Whats_app_banner