मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 13 June 2024 : वज्र योगात आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 13 June 2024 : वज्र योगात आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार? वाचा राशीभविष्य

Jun 13, 2024 09:12 AM IST

Today Horoscope 13 June 2024 : आज ज्येष्ठ महिन्याची सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथीचा दिवस बाराही राशींसाठी कसा असणार त्याबाबत जाणून घेऊया.

राशीभविष्य १३ जून २०२४
राशीभविष्य १३ जून २०२४

हिंदू कॅलेंडरनुसार सध्या ज्येष्ठ माह सुरु आहे. आज ज्येष्ठ महिन्याची सप्तमी तिथी आहे. तसेच आज वज्र योग गरज करण असणार आहे. या सर्व योगात आज गुरुवारचा दिवस राशीचक्रातील बाराही राशींना कसा जाणार ते राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मेष: 

आज वज्र योगात शुभ फलदायी घटना घडणार आहेत. सरकारी नोकरीतल्या लोकांना प्रमोशन मिळण्याचे योग येतील. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्याल.

वृषभ: 

आज शनिशी होणारा चंद्रयोग पाहता धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पैशाचे पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हवे ते प्रयत्न करायची तयारी ठेवाल.

मिथुन: 
आज गरज करणात घरासंबंधी समस्या होऊ शकते. कोणत्याही कामाचे नियोजन करण्यात मात्र कमी पडण्याची शक्यता आहे. बुद्धीचा उपयोग विधायक कामासाठी करणे आवश्यक आहे. मित्रपरिवारावर जास्त विश्वास टाकणे योग्य ठरणार नाही.

कर्कः 

आज चंद्र शनिशी संयोग करीत असल्याने आर्थिक आघाडीवर प्रगती होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय नोकरी या संदर्भातील कामे लवकर घडून येतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल.

सिंहः 

आज शनि चंद्र योगात तुमची बौद्धिक क्षमता सिद्ध कराल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने एखादी आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे.

कन्याः 

आजच्या चंद्रभ्रमणात कोणत्याही परिस्थितीचा भेद करून तुमच्या पुढे येण्याच्या इच्छेला पूरक वातावरण लाभेल. तरीसुद्धा अनावश्यक चिंता तुमचा पाठलाग करतील.

तूळ: 

आजचे चंद्रबल विचारात घेता कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. खर्चिक आणि उधळ्या स्वभावाला आळा घालावा लागेल.

वृश्चिक: 

आज चंद्राची स्थिती लक्षात घेता कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे लागतील. धाडस आणि कामाचा उरक चांगला राहील.

धनु: 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद निर्माण होतील. व्यापारात व्यवहाराची सांगड योग्यरितीने घातली नाही तर तोट्याचे प्रमाण वाढेल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल.

मकर: 

आज वज्र योगात आपणास मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही तडजोडी कराव्या लागतील.

कुंभ: 

आज शनिचे बल उत्तम लाभल्याने लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. वैवाहिक आयुष्यात घरातील वातावरण आनंदी राहील.

मीनः 

आज शनि चंद्र संयोगात बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. व्यवसायात लहरीपणा ठेऊन चालणार नाही. कडक बोलण्याने लोकांची मने दुखावली जातील.

WhatsApp channel