आज रविवार १२ मे २०२४ रोजी, पंचमीचा चंद्र कर्क राशीतून आणि राहु आणि गुरूच्या नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. चंद्राचे मंगळ, राहु नेपच्युनशी संयोग होत असुन नवमपंचम योग घटीत होत आहे. धृती आणि शुल योगात आज रविवार सुट्टीचा दिवस कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सर्व योगांचा परिणाम राशीचक्रातील राशींवर कसा होणार हे जाणून घेऊया.
आज चंद्राशी होणारा ग्रहांचा संयोग पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील.
आज शुल योगात धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक वाहवाह करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील.
आजच्या चंद्र संक्रमणात कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती-प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अंमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल.
आजच्या चंद्र भ्रमणात कष्टाची चांगली फळे मिळतील. तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. अती संवेदनशील असल्यामुळे थोडा तापटपणाही वाढेल. तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल.
आज अनिष्ट ग्रहमान असल्याने वैवाहीक आयुष्यात वाद जास्त ताणायचे नाहीत याकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत विनाकारण चिंता कराल. खर्चाचा आकडा थोड़ा वाढल्यामुळे ते साहजिक आहे. दुपारनंतर अचानक पैसे मिळणार आहेत. कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळावे. कोणालाही जामीन राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल.
आज राहुच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात काही महत्त्वाची कामे रखडतील. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. अती संवेदनशील स्वभावामुळे कधीकधी नुकसान होऊ शकते. घरातील शांततेचे वातावरण जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. आजच्या दिवशी व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये.
आज अनुकूल ग्रहयुतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा खर्च होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे.
आज धृती योगात खरेदी आणि शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्यांना काम केल्याचे समाधान मिळेल. तरुणांना प्रेम प्रकरणात यश येईल. समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल.
आज अनिष्ट चंद्रभ्रमणात सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. तुमचा अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. त्यात कौटुंबिक वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. मन उदास राहील. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल.
आज चंद्र संक्रमणात जुनी येणी वसूल होतील. एखाद्या कामासाठी प्रचंड कष्ट करावे लागतील. मात्र यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम राहणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा अचानक कुटुंबातील अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल.
आज शुल योगातील चंद्रभ्रमणात समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून ध्येयापर्यंत पोचण्याचा फार चांगला गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्या अडचणींवर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील.
आज प्रतिकूल ग्रहयुतीमुळे आरोग्य बाबतीत विशेष लक्ष द्यावे. झोपेची तक्रार राहील. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. इतर लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन काय सांगते याचा विचार करा. घरातील वातावरण तणावात्मक राहील. कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी विचार करावा लागेल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहील.
संबंधित बातम्या