मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 12 June 2024 : बुधवारचा दिवस मेष-वृषभ राशीसाठी लाभाचा, तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 12 June 2024 : बुधवारचा दिवस मेष-वृषभ राशीसाठी लाभाचा, तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य

Jun 12, 2024 09:38 AM IST

Today Horoscope 12 June 2024 : चंद्रभ्रमणातून आज हर्षण योग आणि कौलव करणची निर्मिती होत आहे. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य १२ जून २०२४
राशीभविष्य १२ जून २०२४

आज बुधवार १२ जून २०२४ रोजी चंद्र सिंह राशीतून आणि मघा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. त्यातूनच आज हर्षण योग आणि कौलव करणची निर्मिती होत आहे. या योगात आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल की नकारात्मक हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मेष: 

आज कौलव करणात आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल. जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे.

वृषभ: 

आज चंद्राचा मंगळशी होणारा योग पाहता कामातील बदलसुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. पूजापाठ करणार्‍यांना भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल.

मिथुन: 

आज हर्षण योगात भागीदाराकडून सहकार्य लाभेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल.

कर्कः 

आज कौलव करणात विचारपूर्वक निर्णय घ्या. थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल.

सिंहः 

आज चंद्रबल लाभल्याने कामाचा दर्जा वाढवण्या वर तुमचा भर राहील. संतुलित विचाराचा पाठपुरावा करण्याच्या तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे. व्यवहारिक समस्या दूर होतील.

कन्या: 

आज चंद्राचा मंगळाशी होणारा योग पाहता आपल्या व्यक्तीत्वामध्ये सुधारणा करावी असे सारखे वाटत राहील. वैवाहिक आयुष्यात आनंदी वातावरण राहील. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे.

तूळ: 

आज चंद्राचा मंगळशी होत असलेला योग पाहता व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. कायदेशीर कामात यश मिळेल.

वृश्चिकः 

आज शुक्र राशीपरिवर्तनात कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. 

धनु: 

आज अशुभ स्थानातील चंद्रभ्रमण पाहता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. अनावश्यक कारणांमुळे घरातील खर्च वाढतील. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल.

मकरः 

आजचे चंद्रबल पाहता परदेशासंदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल.  एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल.

कुंभः 

आज हर्षण योगात व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कर्ज हवे असणाऱ्यांना त्याची तरतूद करता येईल. फक्त अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले पडेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या.

मीन: 

आज शुभ स्थानातील चंद्रभ्रमण पाहता तुमच्यात असलेली कला लोकांपर्यंत पोचावी याचा आटोकाट प्रयत्न कराल. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल.

WhatsApp channel