आज मंगळवार ११ जून २०२४ रोजी चंद्र राहू आणि नेपच्युनशी नवमपंचम योग करणार आहे. तसेच आज कौलव करण आणि व्याघात योगसुद्धा असणार आहे. या सर्वांमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार ते राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.
आज चंद्र-नेपच्युन संयोगात मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. नोकरी व्यवसायात अनपेक्षित यश मिळेल. ग्रहांची साथ चांगली मिळेल.
आज व्याघात योग पाहता तुमच्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो.
आज कौलव करणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहिल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल.
आज राहुशी होणारा चंद्राचा योग पाहता घरामध्ये प्रेमाचा ओलावा मिळण्यासाठी जरा जास्तच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे अस्थिरता जाणवेल.
आज व्याघात योगात विचार पूर्वक निर्णय घ्या. उत्तम कल्पनाशक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही.
आज चंद्र नेपच्युन संयोगात दिनमान विशेष लाभकारक आहे. प्रेमीजनांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. अस्थिर आणि चंचल स्वभावामुळे घरातील लोकांशी मात्र खटके उडण्याची शक्यता आहे.
आज चंद्र राहु योग करत आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील. स्फूर्तिदायक घटना घडल्यामुळे कामामध्ये एक प्रकारची गती जाणवेल.
आज चंद्र नेपच्युन योगात विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. व्यवसायात पार्टनरच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल.
आज चंद्र नेपच्युन संयोगात आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. जुनी येणी वसूल होतील. एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील.
आज चंद्र राहु योगात बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे. प्रेमवीरांनी आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे.
आज व्याघात योगात शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र जोखीम घेण्याचे टाळावे. तुमच्या विक्षिप्त स्वभावाचा कुणी गैरफायदा घेणार नाहीत याची काळजी घ्या.
आज कौलव करणात प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारा दिवस आहे. मानसिकता बिघडल्यामुळे काही गोष्टींना खीळ बसण्याची शक्यता आहे. बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट लाभ मिळतील.
संबंधित बातम्या