आज सोमवार १० जून २०२४ रोजी,चंद्र आणि मंगळ एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या घरात उपस्थित राहतील, ज्यामुळे केंद्र योग तयार होईल, या योगाला धन योग असेही म्हणतात. तसेच, वृषभ राशीमध्ये सूर्य, बुध, गुरू आणि युरेनसचा संयोग तयार होत आहे. ग्रहांच्या बदलांचा प्रभाव तुमच्यासाठी कसा राहील, वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज काळजी घ्यावी लागेल. आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची शक्यता आहे. हप्ते वेळेवर फेडावे. कामाचा गाडा स्वत: ओढाल परंतु त्यामुळे थकवा जास्त जाणवेल. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे.
आज बेरोजगारांना नोकरी मिळेल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. मनाप्रमाणे खरेदी कराल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.
आज आर्थिक व्यवहार करू नयेत. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल.
आज घरामध्ये नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील.
आज बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक सौख्य उत्तम आहे.
आज व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. धनलाभाचा दिवस आहे.
आज क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा.
आज जास्तच कष्ट घ्यावे लागले तरी पैसे मिळणार आहेत. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. यश मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील.
आज उद्भवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. संततीच्या मनाचा आदर केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होईल. कलह होण्याची शक्यता राहील. आर्थिक नुकसान होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. आरोग्याच्या समस्या डोके वर काढतील.
आज आर्थिक घडी बसेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील.
आज प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या.
आज प्रवास लाभदायक ठरेल. प्रचंड मेहनतीच्या मानाने मामुली यश मिळत असल्यामुळे थोडे निराश व्हाल. अशावेळी चुकते कुठे हे कळण्या साठी त्यातील तज्ञांचा सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे.
संबंधित बातम्या