मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 1 May 2024 : मे महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी किती लाभाचा राहील, वाचा राशीभविष्य!

Today Horoscope 1 May 2024 : मे महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी किती लाभाचा राहील, वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 01, 2024 08:36 AM IST

Today Horoscope 1 May 2024 : आज १ मे २०२४ बुधवार रोजी, चैत्र कृष्ण अष्टमी तिथी असून, कालाष्टमीचा आजचा दिवस कसा जाईल? किती लाभ व संधी मिळतील? जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

आजचे राशीभविष्य १ मे २०२४
आजचे राशीभविष्य १ मे २०२४ (Freepik)

आज बुधवार १ मे रोजी, चैत्र कृष्ण अष्टमी असून, श्रवण नक्षत्र आणि शुभ योग आहे. आज चंद्र मकर राशीत संक्रमण करणार आहे. बालव करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष: 

आज मनामध्ये प्रचंड खळबळ राहील. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्येतीची काळजी घ्या. स्वभावानुसार मानसिक चिडचिड दगदग होईल. 

वृषभः 

आज गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. भावंडांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. 

मिथुन: 

आज निराशा पदरात पडेल. आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. 

कर्क: 

आज तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत बॉसची मर्जी राहील. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापार, उद्योगात आर्थिक नुकसान होऊ शकते. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. जुनी येणी उधारी वसुलीत व्यवसायिकांना खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल. 

सिंहः 

आज धनप्राप्तीचा योग आहे. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

कन्या: 

आज रागाचा पारा चढेल. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहु शकते. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याची आहे. मोठे आर्थिक व्यवहार टाळा.

तूळ: 

आज तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. 

वृश्चिक: 

आज एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. संततीकडून समाधान लाभेल. नोकरीची संधी मिळेल. 

धनुः 

आज प्रवासाचे योग आहेत. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जास्त काम करावे लागेल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर फायदा होईल. मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. आत्मविश्वास द्विगुणित होईल. मन प्रसन्न राहील. 

मकर: 

आज भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. परदेशगमनाच्या संधी येतील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल. भाग्याची साथ लाभेल.

कुंभः 

आज अभ्यासात प्रगती करून घेता येईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. नविन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. 

मीन: 

आज आर्थिक गुंतवणूक कराल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. दिनचर्येत अडचणी येतील. अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आत्मविश्वास उंचावलेला असेल. फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल.

WhatsApp channel