मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 1 June 2024 : आज गुरुचा उदय महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोणासाठी ठरेल लाभदायक? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 1 June 2024 : आज गुरुचा उदय महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोणासाठी ठरेल लाभदायक? वाचा राशीभविष्य

Jun 01, 2024 08:06 AM IST

Today Horoscope 1 June 2024 : जोतिष शास्त्रानुसार, आज चंद्र केतू नक्षत्रासोबत षडाष्टक योगाची निर्मिती करत आहे. तर दुसरीकडे बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य १ जून २०२४
राशीभविष्य १ जून २०२४

आज शनिवार १ जून २०२४ रोजी ग्रह-नक्षत्र स्थान बदल करत आहेत. आज अस्त गुरूचा उदय होणार असून मंगळ व हर्शल अनुक्रमे मेष व वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. या हालचालींमुळे विविध योग निर्माण होत आहेत. यामध्ये आजचा दिवस तुम्हाला कसा जाणार हे राशीनुसार जाणून घेऊया.

मेष: 

आज चंद्र राहु संयोगात प्रतिकूल दिनमान राहील. आर्थिकबाबतीत थोडी अस्थिरता जाणवेल. जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. विपरित परिणाम दिसतील. आजच्या दिवशी बँकेतून कर्ज घेणे टाळा.

वृषभः 

आज चंद्रभ्रमण शुभ असल्याने तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशासंदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील.

मिथुन: 

आज चंद्र राहुशी योग करीत असल्याने शारिरिक स्वास्थ सांभाळा. अति कर्तव्यनिष्ठतेमुळे एखादे वेळी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थोडी संघर्षात्मक-विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते.

कर्क: 

आज चंद्र नेपच्युन संयोगात महत्त्वपूर्ण कार्यात विशेष यश येईल. जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यापार व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील.

सिंह: 

आज उत्तराभाद्रपदा नक्षत्रातील चंद्रभ्रमण पाहता तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. कामात गती येईल. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कन्या: 

आज वणिज करण आणी अशुभ स्थानातून होत असलेल्या चंद्रभ्रमणात अपेक्षीत सफलता लाभणार नाही. घरात अपेक्षेप्रमाणे लक्ष द्यायला न जमल्यामुळे सर्वांचीच चिडचिड होईल.

तूळ: 

आज अनुकूल प्रीती योगात नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक: 

आज चंद्रभ्रमण अनुकुल राहिल. नवीन घर खरेदीचा योग आहे. सिनेमासृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील.आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

धनु: 

आज चंद्र नेपच्युन योगात रोजगारातील स्थिती सामान्य राहणार आहे. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. परंतु तुमच्या समतोल स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल.

मकरः 

आज चंद्रबल लक्षात घेता आपल्या कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. वैवाहिक आयुष्यात आनंदी वातावरण राहील.

कुंभ: 

आज चंद्र राहु योग पाहता व्यक्तिगत समस्याचा प्रभाव कामावर राहिल. एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील.

मीन: 

आज चंद्र नेपच्युन संयोग पाहता परदेशात नोकरीच्या संधी चालून येतील. वैवाहिक आयुष्यात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारा साठी निश्चित वेळ द्याल.

WhatsApp channel