Shani Guru Rahu Ketu Gochar: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशीपरिवर्तनाला खूप महत्त्व मानले जाते. ग्रहांची हालचाल बदलल्याने सर्व १२ राशींवर परिणाम होतो. काही राशींना शुभ फळ मिळते तर काही राशींना अशुभ फळ मिळते. पुढील वर्षी, म्हणजेच सन २०२५ मध्ये शनी, गुरू आणि राहू-केतूच्या हालचालीत बदल होणार आहे. शनी २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर १४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल. यानंतर राहू १८ मे रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल. १८ मे रोजी केतू सिंह राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनी, गुरू आणि राहू-केतूची हालचाल बदलल्याने काही राशींना फायदा होईल. जाणून घेऊ या, शनी, गुरु, राहू आणि केतूच्या या राशीपरिवर्तनामुळे कोणत्या राशींना होईल फायदा.
शनी, गुरु, राहू-केतू गोचर स्थितीमुळे मेष राशीच्या जातकांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ सिद्ध होईल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. त्याच प्रमाणे मेष राशीच्या जातकांना आर्थिक लाभाच्या संधी प्राप्त होतील. त्यामुळे या जातकांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.
मिथुन राशीच्या जातकांचे धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. ग्रहांच्या या स्थितीमुळे मिथुन राशीच्या जातकांना आकस्मिक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. रोजगाराच्या शोधात असलेल्या मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ राहील.
शनी, गुरु, राहू-केतूच्या गोचरामुळे किंवा अशा ग्रहस्थितीमुळे सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. सुदैवाने सिंह राशीच्या जातकांची काही कामे होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला कौतुकाची थाप मिळेल. तुम्ही न्यायालयीन खटले जिंकाल. या काळात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. धनलाभाबरोबरच तुम्हाला पुण्य आणि ज्ञानाची प्राप्ती होईल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
संबंधित बातम्या