सध्या जुलै महिना सुरु आहे. जुलै महिन्यात विविध ज्योतिषीय बदल घडून येत आहेत. या महिन्यात अनेक मोठे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत आहेत. या ग्रहांच्या राशी परिवर्तनातून विविध शुभ-अशुभ योग जुळून येत आहेत. या योगांचा परिणाम राशीचक्रातील राशींवर होत आहे. शिवाय अनेक मोठमोठे ग्रह एकाच राशीत विराजमान होऊन शुभ संयोग निर्माण करत आहेत. या शुभ संयोगाचा शुभ परिणाम राशीचक्रातील काही राशींवर होत आहे. या लाभातून काही राशींचे नशीब अक्षरशः उजळून निघत आहे. आर्थिक लाभापासून ते वैवाहिक सुखापर्यंत या राशींना सर्वच बाबींमध्ये समाधान लाभत आहे.
येत्या दोन दिवसांत चंद्राच्या राशीत दोन मोठे ग्रह गोचर करणार आहेत. चंद्र राशी कर्कमध्ये सूर्य, शुक्र आणि बुध यांची युती पाहायला मिळणार आहे. सध्या कर्क राशीत बुध आणि शुक्र ग्रह विराजमान आहेत. दरम्यान आता १६ जुलै २०२४ रोजी ग्रहांचा राजा सूर्यसुद्धा कर्क राशीत गोचरप्रवेश करणार आहे. त्यामुळे कर्क राशीत सूर्य, बुध आणि शुक्र एकत्र विराजमान असणार आहेत. या तीन ग्रहांच्या युतीमधून 'त्रिग्रही' योगाची निर्मिती होत आहे. हा योग राशीचक्रातील काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. या ग्रहाचा लाभ होणाऱ्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
सूर्य, शुक्र आणि बुधच्या युतीचा फायदा मिथुन राशीच्या लोकांना होणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. आयुष्यात सकारात्मक बदल जाणवतील. तुमच्यात एक वेगळाच उत्साह निर्माण होईल. प्रत्येक कार्यात आवर्जून सहभाग घ्याल. हातातील सर्व कामे विनाअडथळा पूर्ण होतील. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांमध्ये रुची निर्माण होईल. घरामध्ये शुभ कार्य घडेल. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न असेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन प्रकृती उत्तम राहील. मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी लाभेल.
त्रिग्रही योगाचा लाभ वृश्चिक राशीच्या लोकांना मिळणार आहे. याकाळात तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे अचानक पूर्ण होतील. कमाईचे नवनवीन मार्ग सापडतील. त्यातून आर्थिक उत्पन्न वाढेल. घरात भौतिक सुख देणाऱ्या वस्तूंची खरेदी होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. उद्योग-व्यवसायात मोठा आर्थिक नफा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद दूर होऊन संबंध सुधारतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील.
सूर्य, शुक्र आणि बुधच्या संयोगातून निर्माण होणारा त्रिग्रही योग सिंह राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. याकाळात धार्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. धार्मिक गोष्टी करण्याकडे विशेष ओढ राहील. पैशांची आवक वाढेल. त्यातून आर्थिक स्थिती मजबूत होईल. मिळकतीचे विविध मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. मात्र तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अथवा अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. परंतु उत्पन्न वाढल्याने फारसा फरक पडणार नाही. वैवाहिक आयुष्यामध्ये पतिपत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल.
संबंधित बातम्या